जीवसृष्टीच्या शोधात भारताचा पुढाकार - डॅा. जयंत नारळीकर

संतोष शेंडकर
शुक्रवार, 23 मार्च 2018

सोमेश्वरनगर (पुणे) : अवकाशात सूर्यासारखे अनेक तारे आणि हजारोंच्या वर ग्रह आहेत. केवळ पृथ्वीवरच जीव आहेत असे नाही. कारण अंतराळात जीवसृष्टीला आवश्यक असणारे कार्बनिक रेणू आहेत. तसेच जीवसृष्टी नांदायला 'योग्य ठिकाणी' ग्रह आहेत. त्यामुळे पलिकडे जीवसृष्टी असण्याचा संभव आहे. साधारणतः लाख ते दहा लाख अतिप्रगत जीवसृष्टी आकाशगंगेत असू शकतील असा अंदाज आहे. त्यांच्याशी संवाद झाला नाही मात्र, शोध सुरू आहेत, असा दावा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॅा. जयंत नारळीकर यांनी केला.  

येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व सोमेश्वर इंजिनिअरिंग कॅालेजच्या वतीने आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'पृथ्वीपलिकडील जीवसृष्टीचा शोध' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते. याप्रसंगी उद्योजक आर. एन. शिंदे, सोमेश्वरचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे, संचालक उत्तम धुमाळ, किशोर भोसले, सिध्दार्थ गीते, शैलेश रासकर, विशाल गायकवाड, ऋतुजा धुमाळ आदी उपस्थित होते.

नारळीकर म्हणाले, जीवसृष्टीत जसे कार्बनिक रेणू असतात तसेच अंतराळातही आहेत त्यामुळे पलिकडे जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या जगण्याला उर्जा सूर्यापासून मिळते. अन्यत्र असा सूर्य आणि त्याच्याभोवती योग्य अंतरावर ग्रह आहेत का याचा शोध सुरू झाला. 1990-95 च्या दरम्यान असे तारे आढळले.  फ्रँक ग्रेग या खगोलशास्त्रज्ञाने मांडलेल्या समीकरणानंतर साधारणतः आकाशगंगेत एक ते दहा लाख एवढी अतिप्रगत जीवसृष्टी असू शकते असा अंदाज आहे.

अल्फा सेन्टा ही सौरमाला सव्वाचार प्रकाशवर्ष दूर आहे. यानातून जायला दोन लाख वर्ष लागतील. शंभर माणसं यानात पाठवायची आणि ती प्रजोत्पादन करत पोचतील अशी कल्पना पुढे आली. त्यात अडचणी आहेत. त्याऐवजी रेडिओलहरी पाठवून संदेश द्यावा. या लहरी प्रकाशाच्या वेगाने जातात. तरीही संभाषण पोचायला आणि परत यायला साडेआठ वर्ष लागतील. तरीही संगणकावर अनेक चॅनेल तयार ठेवून संदेश टीपण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॅा. मंगला नारळीकर यांनी, शाळांमध्ये सूर्यमालेचे मॅाडेल शास्त्रीय पध्दतीने लावले पाहिजे. त्यातून खगोलशास्ज्ञाचे, ग्रहणांचे ज्ञान मुलांना दिले गेले पाहिजे, असे मत मांडले. प्राचार्य डॅा. अजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा. करिश्मा आटोळे यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव भारत खोमणे यांनी आभार मानले.  

जीवसृष्टीच्या शोधात भारताचा पुढाकार 
धूमकेतूसोबत बॅक्टेरीया, जीवसृष्टीतले जीवाणू गोठून येतात. आपल्या अवकाशात सूर्याच्या उर्जेने ते जागे होतात. ते जीवकण शोधण्याचा प्रयत्न 'इस्त्रो'च्या पुढाकाराने भारतात सुरू आहे. एका बलूनला यंत्र बसून 41 किलोमीटर उंचीवरील हवा गोळा करून बाटलीत साठवायची. बाटलीत जीवकण आढळतात का याचा अभ्यास करायचा असेही सुरू आहे, असेही नारळीकर यांनी सांगितले. 

Web Title: India's initiative in search of living habitat - jayant naralikar