इंदिरा गांधी पुलाची अडीच वर्षांनंतर दुरुस्ती

पिंपरी - धोकादायक असलेल्या इंदिरा गांधी पुलावरून सुरू असलेली वाहतूक.
पिंपरी - धोकादायक असलेल्या इंदिरा गांधी पुलावरून सुरू असलेली वाहतूक.

पिंपरी - गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या येथील इंदिरा गांधी उड्‌डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, आठवड्याभरात काम सुरू होणार आहे.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर राज्य सरकारने राज्यातील सर्व पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचे आदेश दिले होते. त्यामुळे अत्यंत दुरवस्था झालेल्या इंदिरा गांधी पुलाचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्याच्या बांधणीला सुमारे ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पुलाच्या कठड्याचे सिमेंट गायब झाले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूच्या जिन्यांची स्थिती अत्यंत धोकादायक आहे. 

महाडच्या दुर्घटनेनंतर या पुलाचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला अहवाल दिलेल्या मुदतीपेक्षा सुमारे सहा महिने उशिरा झाला. त्यानंतर महापालिकेने दोन वेळा निविदा प्रसिद्ध केल्या. मात्र, या निविदांना ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काम रखडल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेनुसार काम मंजूर झाले आहे. त्यासाठी आठ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. 

रेल्वेच्या हद्दीतील पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. उर्वरित काम पालिकेतर्फे करण्यात येईल. त्यानुसार पुलाचे बेअरिंग बदलणे, भेगा असलेला भाग बुजविणे, जिन्यांची दुरुस्ती, धोकादायक झालेल्या खांबांना जॅकेटिंग करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. 

यासंदर्भात पालिकेचे उपअभियंता दीपक पाटील म्हणाले, ‘‘आठवड्याभरात कामाचा आदेश देण्यात येईल. संबंधित ठेकेदाराला कामासाठी १८ महिन्यांची मुदत दिली आहे. मात्र, १२ महिन्यांमध्ये काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न राहील.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com