इंदिरा गांधींनी जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढविली - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

वारजे-माळवाडी : "शिक्षण, प्रशिक्षण मिळाले, की मुली सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतात. स्वातंत्र्यानंतर जगामध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव प्रभावीपणे घेतले जाते. त्यांनी जगात भारताची प्रतिष्ठा वाढविली,'' असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी क्राँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व टाटा ट्रस्ट यांच्या वतीने खडकवासला मतदार संघ आणि मुळशी तालुक्‍यातील दीड हजार मुलींसह आशा वर्करांना सायकलचे वाटप करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, चेतन तुपे, विशाल तांबे, शुक्राचार्य वांजळे, टाटा ट्रस्टचे सचिव बुर्जिस एस. तारापोरवाला, मुख्य वित्त अधिकारी आशिष देशपांडे, रूपाली चाकणकर, सविता दगडे, सचिन दोडके, दिलीप बराटे, सायली वांजळे, काका चव्हाण आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, "मी संरक्षणमंत्री असताना लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या वेळी लष्करात मुलींना घेणे शक्‍य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. इंग्लंड अमेरिकेत मुली लष्करात आहेत, मग भारतात ते का शक्‍य नाही, असा प्रश्‍न मी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर मुलींना लष्करात संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.''

सुळे म्हणाल्या, "आशा वर्करांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हेल्थ कार्ड योजना सुरू करणार आहे. दुर्गम भागातील अंगणवाड्यांमध्ये आजही वीज व पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. याबाबत लवकरच भूमिका घेतली जाईल.''

Web Title: Indira Gandhi raises India's reputation in the world - Sharad Pawar