आळंदीत इंद्रायणीवरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली

vilas kate
शनिवार, 27 जुलै 2019

इंद्रायणी नदीपात्रालगतचे ज्ञानेश्वरी मंदिर आणि काही धर्मशाळांच्या परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. नदीपात्रातील संपूर्ण जलपर्णी पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहे. नगरपालिकेच्या वतीने नदीकाठच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

इंद्रायणी नदीला पूर; जुन्या दगडी पुलावरील वाहतूक बंद 

आळंदी ः मावळ तालुक्‍यात गेली चार ते पाच दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला पूर आला. इंद्रायणीवरील दोन्ही दगडी घाट, भक्ती सोपान पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. जुन्या दगडी पुलापर्यंत पाणी आले असून दक्षतेचा उपाय म्हणून पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद ठेवली आहे. 

जिल्ह्याबरोबरच मावळ भागातही संततधार पाऊस सुरू आहे. मावळ भागातील वडिवळे धरण 95 टक्के भरले असून प्रतिसेकंद 4700 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे. परिणामी, आळंदीतील इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. इंद्रायणीवरील दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. इंद्रायणी नदीपात्रालगतचे ज्ञानेश्वरी मंदिर आणि काही धर्मशाळांच्या परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. नदीपात्रातील संपूर्ण जलपर्णी पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहे. नगरपालिकेच्या वतीने नदीकाठच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी नगरपालिका चौकातील जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indrayani flood in alandi

फोटो गॅलरी