पुरंदरच्या पश्चिम भागात इंद्रायणीचा सुगंध दरवळणार

कोडीत (ता. पुरंदर) - येथे भात लागवडीसाठी रोपे काढत असताना.
कोडीत (ता. पुरंदर) - येथे भात लागवडीसाठी रोपे काढत असताना.

गराडे - पुरंदरच्या पश्चिम भागात दोन तिन दिवस पडणाऱ्या पावसाने दमदार हजेरी लावलेल्यामुळे क-हानदीला  पाणी आले असून पच्चिम भागातील ओढे, नाले पाण्याने भरुन वाहुन लागले आहेत. त्यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा करणारे गराडे जलाशय पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. त्यामुळे पुरंदरच्या पश्चिम भागात इंद्रायणीचा सुगंध दरवळणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नारायणपूर ( ता. पुरंदर ) या परिसरात व  पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या परिसरात पाऊस न झाल्यामुळे भात लागवड करणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले होते. त्यामुळे उपलब्ध विहिरीच्या पाण्यावर भात लागवड करण्याचा प्रयोग नारायणपूर मधील शेतकऱ्यांनी केला होता. पण नुकत्याच झालेल्या पावसामुळे आता या रोपांना जीवदान मिळाले असून रखडलेली भात लागवड पुन्हा सुरू झाल्या असल्याची माहिती नारायणपुरच्या सरपंच सुजाता भुजंग बोरकर व माजी सरपंच रामभाऊ बोरकर यांनी दिली.

गावात साधारण इंद्रायणी वानाला सर्वच शेतकरी महत्त्व देतात. यात भात पिक चांगले आले तर एकरी ३५०० किलो उत्पन्न निघते. ४५ /५० रुपये किलो बाजारभाव धरला तर एकरी दीड लाख  रुपये होतात. आता पावसाच्या हजेरीने पुरंदरच्या पश्चिम भागात इंद्रायणीचा सुगंध दरवळणार असल्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे।

याच बरोबर आस्करवाडी, भिवरी  बोपगाव, चांबळी, हिवरे, भिवडी, नारायणपुर, चिव्हेवाडी, देवडी, केतकावळे, पानवडी, काळदरी या परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे या ठिकाणीच्या भात लागडी सुरु झाल्या आहेत असे कृषी सहाय्यक रामसिंग ठाकूर यांनी केले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com