पुणे : माझे कोणी समर्थक नाही. अज्ञात लोकांनी तृप्ती देसाई यांना धमकी दिली असेल तर त्यास मी जबाबदार नाही. कीर्तनातून महिला अपमानित होतील, अंधश्रद्धा पसरेल असे वक्तव्य आजपर्यंत कधीच केलेले नाही, असे निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी स्पष्ट केले आहे.
इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनातून अंधश्रद्धा पसरविणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते. महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करीत जाहीररित्या अपमान केला, असा आरोप करीत या मुद्यावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ऍड. मिलिंद पवार यांच्यामार्फत 26 फेब्रुवारी रोजी कायदेशीर नोटीस बजावली होती. महिलांची जाहीर माफी मागावी व पुन्हा अशी टिप्पणी करणार नाही, असे जाहीर करावे, अशी मागणी देसाई यांनी नोटीशीद्वारे केली होती. या नोटिशीला इंदोरीकर महाराज यांनी त्यांचे वकील ऍड. डॉ. मिलिंद साळुंखे यांच्यामार्फत ऍड. पवार यांना उत्तर दिले आहे. देसाई यांनी केलेले आरोप या नोटीसद्वारे इंदोरीकर महाराज यांनी फेटाळून लावले आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात आवाज उठवायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना फोन करून जीवे मारण्याची धमक्या दिल्या आल्या होत्या. याविरोधात त्यांनी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात निवृत्ती महाराज देशमुख व धमकी देणाऱ्या विरोधात तक्रार दिली आहे. परंतु, लाॅकडाऊनमुळे ती तक्रार प्रलंबित आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
समन्स मिळाल्यावर पुढील प्रक्रिया
इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात दाखल असलेल्या फौजदारी खटल्याची संगमनेर न्यायालयाने दखल घेतली आहे. पुढील न्यायालयीन प्रकियेबाबत समन्स काढण्यात येईल. त्यात इंदोरीकर महाराजांनी न्यायालयात कधी हजर व्हायचे याचा उल्लेख असेल. अद्याप याबाबत समन्स मिळाले नाही, असे इंदुरीकर महाराजांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.
दिलगीरही व्यक्त केली आहे
निवृत्ती महाराज देशमुख यांच्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर व त्यांच्या कीर्तनातील वक्तव्यावरून गोंधळ झाल्याने निवृत्ती महाराज देशमुख यांनी दिलगीरही व्यक्त केली होती.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नोटीसीला मुद्दे :
- अज्ञात व्यक्तींनी तृप्ती देसाई यांना केलेल्या फोनला निवृत्ती महाराज जबाबदार नाही
- कीर्तनातून महिलांचा अपमान केला नाही
- अंधश्रद्धा पसरेल असे वक्तव्य केले नाही
- तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप फेटाळण्यात आले आहे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.