जंक्शनमधील उद्योजकांना खासगी सावकारकीचा जाच

जंक्शनमधील उद्योजकांना खासगी सावकारकीचा जाच

वालचंदनगर : जंक्शन (ता.इंदापूर) परिसरातील लघू उद्योजक खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळले आहेत. खासगी सावकार पैशासाठी उद्योजकांच्या घरी जाऊन तासन् तास बसत असल्याने कुटुंबातील सदस्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस तक्रार घेण्यासाठी टोलवाटोलवी करीत असल्याचा प्रकार घडत आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील जंक्शन हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून या परिसरातील उद्योगांना घरघर लागली आहे. येथील अनेक लघू उद्योजक अडचणीमध्ये सापडले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेकडील घेतलेले कर्ज थकल्यामुळे उद्योजकांनी खासगी सावकारकडून दरमहा दहा टक्के व्याजाने कर्ज घेतली आहेत. येथील एका लघू उद्योजकाने गेल्या दोन वर्षांपूर्वी एका खासगी सावकाराकडून १७ लाख रुपये व्याजाने घेतले होते.

पाच वर्षामध्ये  मुद्दल व व्याजसह ६० लाख रुपये परत दिले आहेत. मात्र, तरी ही खासगी सावकार ४० लाख रुपयांची मागणी करुन पैशांसाठी तगादा लावत आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपासून खासगी सावकार लघू उद्योजक घरामध्ये नसतानाही घरामध्ये जाऊन तासन् तास बसत असल्यामुळे लघू उद्योजकाचे कुंटुब अडचणींमध्ये आले असून महिलांनाही खासगी सावकारकीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

संबधित लघू उद्योजकाने बारामती येथील उपविभागीय पोलिस कार्यालय व वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये तीन खासगी सावकरकीच्या विरोधामध्ये तक्रारी अर्ज दिलेला आहे. मात्र पोलिस पुरावे मागून तक्रार दाखल करुन घेण्यास टोलवाटोलव करीत  असल्याने आहेत. यासंदर्भात वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तक्रारदार यांनी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज केला असुन त्यांची  डीवायएसपी चौकशी करणार असल्याचे सांगितले. 

तक्रारदारांना न्याय मिळणार का ?

पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी खासगी सावकराच्या विरोधात कडक कारवाई करणार असल्याचे जाहिर केले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये अनेक खासगी सावकारांचा मनमानी कारभार सुरु आहे. यांच्याविरोधात तक्रारी अर्ज देऊन कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने खासगी सावकारकीच्या विरोधात कारवाई होणार का ? असा प्रश्‍न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com