‘उद्योगांचे शहराजवळ विकेंद्रीकरण व्हावे’ - नितीन गडकरी

हॉटेल हयात - एमसीसीआयए आणि जीआयझेड यांनी लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ‘इनोव्हेशन कॉन्क्‍लेव्ह’मध्ये नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मार्गदर्शन केले. या वेळी (डावीकडून) गडकरी, प्रशांत गिरबान, राममोहन मिश्रा, प्रदीप भार्गव, डॉ. अनिल काकोडक
हॉटेल हयात - एमसीसीआयए आणि जीआयझेड यांनी लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ‘इनोव्हेशन कॉन्क्‍लेव्ह’मध्ये नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मार्गदर्शन केले. या वेळी (डावीकडून) गडकरी, प्रशांत गिरबान, राममोहन मिश्रा, प्रदीप भार्गव, डॉ. अनिल काकोडक

मेट्रो सिटीजचा विकास करताना नागरी स्थलांतरामुळे नव्या समस्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे शहरांच्या जवळ असलेल्या ठिकाणी उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. शहरांबाहेर लॉजिस्टिक पार्कसाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होऊ शकेल,’’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) तर्फे व डॉइश गेझेल शाफ्ट फ्युअर इंटरनागझियोनाल झुजामेनार बाईट (जीआयझेड), जीएमबीएच व भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने ‘इनोव्हेशन कॉन्क्‍लेव्ह’चे आयोजन हॉटेल हयात येथे केले होते. त्यांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राम मोहन मिश्रा व आरजीएसटीसीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, सरसंचालक प्रशांत गिरबान, जीआयझेड इंडियाच्या प्रायव्हेट सेक्‍टर विभागाचे संचालक नूर नक्‍सबांदी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, ‘‘ शेती, ग्रामीण व आदिवासी विभागाचा तंत्रज्ञानातून विकास करण्यासाठी एमसीसीआयएने प्रयत्न करावेत. संशोधनातून नवी उत्पादने बाजारात आली पाहिजेत. त्यातून नवे रोजगार उपलब्ध होतील. रस्ते, पाणी आणि विमानतळांच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील  आहे.

१०० विमानतळे, २२ ग्रीन रोड, जलवाहतुकीकरता बंदरांचा विकास सुरू आहे. या सर्वांचा फायदा सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना होईल. निर्यात वाढवताना आयात कमी करण्याचे लक्ष्य आहे.’’  

डॉ. काकोडकर म्हणाले, ‘‘ग्रामीण क्षेत्रात आर्थिक विकास घडवून आणण्याची मोठी संधी आहे. मात्र, त्यासाठी ग्रामीण युवकांमध्ये क्षमतावाढीवर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे. शेती, उत्पादननिर्मिती आणि सेवा हे अर्थव्यवस्थेचे तीनही पैलू ग्रामीण क्षेत्रात मोठी प्रगती करू शकतात.’’ 

मिश्रा म्हणाले, ‘‘अभिनवता हा पर्याय नसून गरज आहे. उपलब्ध संधींचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी व्यवसायांचे नेटवर्क विकसित करण्याची गरज आहे. मंजिरी देसाई यांनी सूत्रसंचालन केले. गिरबान यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com