उद्योग- व्यवसायही सावरले !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

कोरोनाचा लॉकडाउन मार्चपासून लागू झाला. त्याचा शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील उद्योग क्षेत्रावर काय परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यासाठी "एमसीसीआयए'ने एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंतच्या महिन्यांचा अभ्यास केला. त्यानुसार उद्योग क्षेत्रात दरमहा होत असलेल्या बदलाची नोंद घेण्यात आली. प्रामुख्याने उत्पादन क्षमतेत आणि मनुष्यबळ उपस्थित राहण्याच्या प्रमाणात झालेल्या वाढीचा त्यात आढावा घेतला.

पुणे - लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल झाला, दिवाळीचा सण बाजारपेठेसाठी चांगला गेला अन् त्याचे प्रतिबिंब उद्योग क्षेत्रातही उमटले. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा या महिन्यात उत्पादनाची पातळी 78 टक्‍क्‍यांवर तर मनुष्यबळ उपस्थित राहण्याचे प्रमाण 82 टक्‍क्‍यांवर पोचले आहे, असे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) सर्वेक्षणात सोमवारी आढळले.

कोरोनाचा लॉकडाउन मार्चपासून लागू झाला. त्याचा शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील उद्योग क्षेत्रावर काय परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यासाठी "एमसीसीआयए'ने एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंतच्या महिन्यांचा अभ्यास केला. त्यानुसार उद्योग क्षेत्रात दरमहा होत असलेल्या बदलाची नोंद घेण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रामुख्याने उत्पादन क्षमतेत आणि मनुष्यबळ उपस्थित राहण्याच्या प्रमाणात झालेल्या वाढीचा त्यात आढावा घेतला. ऑक्‍टोबरच्या तुलनेत उत्पादन क्षमता 72 वरून 78 टक्‍क्‍यांवर पोचल्याचे आणि मनुष्यबळ कामावर उपस्थित राहण्याचे प्रमाण 77 वरून 82 टक्‍क्‍यांवर पोचल्याचे त्यात आढळून आले. या सर्वेक्षणासाठी 150 उद्योगांच्या प्रतिनिधींशी "एमसीसीआयए'ने संवाद साधला. त्यातून उत्पादनाचा आणि मनुष्यबळ उपस्थितीचा निष्कर्ष काढला आहे.

या सर्वेक्षणात 69 टक्के उत्पादन तर 11 टक्के सेवा क्षेत्रातील उद्योग-व्यावसायिकांनी भाग घेतला. उर्वरित 20 टक्के उद्योग मिश्र क्षेत्रातील आहेत. सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील 18 टक्के, लघु क्षेत्रातील 23 टक्के, मध्यम क्षेत्रातील 26 आणि मोठ्या उद्योग क्षेत्रांतील 33 टक्के उद्योग-सेवा क्षेत्राच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, धानोरी भागात मिळणार पुरेसे पाणी कारण..
उद्योगांना काय वाटते ?
कोविड पूर्व परिस्थितीनुसार उद्योग पूर्वपदावर आले आहेत का, असा प्रश्‍न "एमसीसीआयए'ने सर्वेक्षणात विचारला होता. त्याला उत्तर देताना 26 टक्के उद्योगांनी त्यांचे उद्योग कोविड पूर्व परिस्थितीनुसार आले आहेत, असे सांगितले. तर, 22 टक्के उद्योगांनी त्यासाठी आणखी तीन महिने लागतील असे सांगितले. आणखी तीन ते सहा महिने लागतील असे 25 टक्के उद्योगांनी सांगितले तर, किमान सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागेल, असे 18 टक्के उद्योगांचे म्हणणे आहे. नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागेल, असे आठ टक्के उद्योगांना वाटते. एक टक्के उद्योगांना अद्याप अनिश्‍चितता भासते.

रिकव्हरी स्लो
सूक्ष्म आणि अनौपचारिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांच्या उत्पादन वाढीचा आणि मनुष्यबळ उपस्थित राहण्याचा वेग मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे. कारण, हे उद्योग अप्रत्यक्षपणे मोठ्या उद्योगांवर अवलंबून असतात. मोठ्या कंपन्यांकडे ऑडर्स आल्यावर सुटे भाग किंवा कच्च्या मालाच्या ऑडर्स सूक्ष्म किंवा लघु उद्योगांपर्यंत पोचण्यास वेळ लागतो. त्यामुळेही त्यांची "रिकव्हरी' स्लो असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे. मात्र, येत्या दोन महिन्यांत या परिस्थितीत बदल होण्याचीही चिन्हेही त्यात आढळली आहेत.

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर दुधाचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

ऑक्‍टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये उत्पादनात वाढ दिसत आहे व त्यासोबतच कामावर उपस्थित असलेल्या कामगारांच्या संख्येतही वाढ आहे. दरमहा होत असलेली प्रगती आनंददायी आहे. मात्र, उद्योग- व्यवसाय आणखी कोविड पूर्व परिस्थितीत पोचले नाहीत, याची नोंद घ्यायला हवी. अतिसूक्ष्म व अनौपचारिक उद्योगांची प्रगती ही मोठ्या उद्योगांच्या तुलनेत आणखीन कमीच आहे.
- प्रशांत गिरबने,महासंचालक, एमसीसीआयए


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Industry-business also recovered as per the MCCIAs weekly surveys