पुण्यात उद्योग क्षेत्रात कोरोनाचे प्रमाण अगदी नगण्य; 'अशी' घेतायेत काळजी

मंगेश कोळपकर
सोमवार, 13 जुलै 2020

शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे 1 लाख 3 हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. त्यात सुमारे 17 लाख कामगार काम करतात. माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगांचाही त्यात समावेश असून सुमारे 3 लाख 50 हजार कर्मचारी त्यात आहेत, अशी जिल्हा उद्योग संचलनालयाकडे नोंद आहे.

पुणे : शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील उद्योगांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घेतलेल्या काळजीमुळे फक्त 22 ठिकाणी सुमारे 70 रुग्ण गेल्या चार महिन्यांत सापडले आहेत. पुणे जिल्ह्यात 35 हजारपेक्षा जास्त रुग्ण असताना उद्योगांतील फक्त 70 रुग्ण आढळले आहेत. सध्या 70 हजारपेक्षा जास्त उद्योगांत सुमारे 7 लाख कामगार काम करीत असतानाची ही वस्तुस्थिती हे चित्र आहे. तरीही या उद्योगांसमोर आता लॉकडाउनने आव्हान निर्माण केले आहे. 

पुणेकर करतायेत वाहनांची टाकी फुल; पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी

Image may contain: one or more people and people sitting

शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे 1 लाख 3 हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. त्यात सुमारे 17 लाख कामगार काम करतात. माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगांचाही त्यात समावेश असून सुमारे 3 लाख 50 हजार कर्मचारी त्यात आहेत, अशी जिल्हा उद्योग संचलनालयाकडे नोंद आहे. कोरोनाच्या लॉकडाउननंतर अनलॉक 1 आणि 2 मध्ये जिल्ह्यातील उद्योग सुमारे 40 टक्के क्षमतेनेच सुरू झाले. त्यामुळे सध्या सुमारे 70 हजार उद्योगांत 7 लाख कामगार सोमवारपर्यंत (ता. 13) कार्यरत होते. आता मंगळवारपासून (ता. 14) दहा दिवसांचा लॉकडाउन सुरू होत आहे. त्यामुळे कामगार कामावर येतील का, त्यांची वाहतूक कशा पद्धतीने करायची, या बाबत अनेक आव्हाने उद्योगांसमोर ठाकली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

Image may contain: one or more people, people standing, car and outdoor

लॉकडाउन शिथिल झाल्यावर उद्योग सुरू करण्यासाठी राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने परवानगी दिली. मात्र, त्यासाठी कमालीची काळजी घेण्याची आदेश दिले होते. त्याला उद्योगांनी भरभरून प्रतिसाद दिला. पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 35 हजारपेक्षा जास्त झालेली असताना, उद्योगांतील फक्त 70 कामगारांचाच त्यात समावेश आहे. रांजणगाव, चाकण, भोर (वर्वे), सणसवाडी, कोथरूड, चिंचवड, हिंजवडी, वाकड येथील 22 उद्योगांत हे 70 कामगार सापडले आहेत. त्यात पुणे परिसरातील एका उद्योगातील 20 तर, भोरमधील एका उद्योगात 14 कामगार होते. उर्वरित 20 उद्योगांतील एक-दोन कामगारांचा समावेश आहे, अशी जिल्हा उद्योग संचलनायातील अधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे कोरोनाच्या काळात पुणे जिल्ह्यातील उद्योगांनी कमालीची काळजी घेतल्याचे दिसून आले आहे. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

उद्योगांना या दिल्या आहेत राज्य सरकारने सूचना 
- कामगारांच्या निवासाची व्यवस्था शक्यतो कंपनीच्या आवारात करा 
- प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱया कामगारांना कामावर बोलावू नका 
- कंपनीच्या प्रवेशद्वारावर, लॉबीमध्ये सॅनिटायझर ठेवा 
- स्वच्छतागृह, कंपनीचे आवार दिवसातून तीन वेळा सॅनिटाईज करा 
- जेवण, नाष्टा यांच्या वेळांमध्ये बदल करा, गर्दी होणार नाही, याची काळजी घ्या 
- कामगारांची वाहतूक करताना बसच्या क्षमतेच्या निम्मीच करा
- चार चाकीतून येणाऱया वाहनांत 3 पेक्षा अधिक कामगार नको 

(आदी 21 सूचना उद्योग विभागाने कंपन्यांना केल्या आहेत) 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

''उद्योग सुरू करण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश उद्योगांना बजावले आहेत. बहुसंख्य उद्योगांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे उद्योगापासून कोरोना दूर ठेवण्यात आम्हा सर्वांनाच यश आले आहे. ''
-  सदाशिव सुरवसे (उद्योग सहसंचालक, पुणे विभाग)

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''कंपनीच्या आवारात येणारे कोणतेही वाहन सॅनिटाईज केले जाते. तसेच प्रत्येक कामगाराची वैद्यकीय तपासणी करून त्याचे रेकॉर्ड ठेवले जाते. कॅंटिनमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाते. तसेच कर्मचाऱयांना चहा  एेवजी काढा दिला जातो. तसेच कोरोनाबाबत काळजी कशी घ्यायची याची पुस्तिका त्यांना दिली असून व्हिडीओही व्हॉटसअपवर पाठविला जातो.''
- संतोष भावे (एचआर डायरेक्टर, भारत फोर्ज)

Image may contain: one or more people, people standing and outdoor

Edited by : Sharayu Kakade


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: industry in pune pcmc are fighting against corona Successfully