अमेरिकेतील महागाईचे चटके भारताला बसणारच; राजनाथ सिंग

भारतात महागाई वाढल्याची चर्चा होत आहे. कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतासह जगातील सर्व देशावर झाला आहे.
Rajnath Singh
Rajnath Singhsakal
Summary

भारतात महागाई वाढल्याची चर्चा होत आहे. कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतासह जगातील सर्व देशावर झाला आहे.

पुणे - भारतात महागाई वाढल्याची चर्चा होत आहे. कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतासह जगातील सर्व देशावर झाला आहे. जगातील सर्वात श्रीमंत देश असलेल्या अमेरिकेत गेल्या ४० वर्षात जेवढी महागाई नव्हती तेवढी महागाई वाढली आहे. मग त्याचे चटके भारतालाही बसणे सहाजिक आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी हिंमतीने पुढे जावे, अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी महागाईवर भाष्य केले.

पुणे दौर्यावर असलेल्या राजनाथ सिंग यांनी टिंगरेनगर येथे भाजप पदाधिकार्यांशी संवाद साधला. खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, हेमंत रासने, गणेश बीडकर, बापू पठारे आदी यावेळी उपस्थित होते.

राजनाथ सिंग म्हणाले, "तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात हे विसरू नका, जगात सर्वात मोठा पक्ष असल्याने समाजासाठी जबाबदारी आपली मोठी आहे. याची जाणीव ठेवा. प्रारंभापासून आपली विचारसरणी केळ सत्ता मिळविण्यासाठी नाही तर देश घडविण्यासाठी राजकारण करत आहोत हे विसरू नका.

मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेतल. त्यामुळे भारताची जगात सर्वात ताकदवान देश आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था अशी ओळख निर्माण झाली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात या गतीने देशाचा विकास होत नव्हता. ७० वर्षानंतरही नागरिकांच्या मुलभूत समस्यांचे कायम होत्या.

२०२२ वर्ष संपेपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकास घर असेल हा संकल्प पूर्ण होत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाने पाणी आणि शौचालय बांधले. जनधन योजनेतून ४५ कोटी बँक खाते उघडण्यात आल्याने शासकीय योजनेतील भ्रष्टाचार बंद झाला.

गिरीश बापट म्हणाले, एकीकडे पाकिस्तान, दुसरीकडे चीन, आतंकवादी आहेत त्यांचा उच्छाद मांडला परकीय शक्ती मदत करत असतात. एक काळी सैनिकांनाना चांगले बूट नव्हते, पण आता केंद्र सरकारने सुविधांसह तंत्रज्ञानाने प्रगत असे लष्कर तयार केले आहे."

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रास्ताविक केले.

मोदींनी थांबवली युक्रेनमधील बॉम्बफेक

रशियाकडून युक्रेनवर बॉम्बफेक सुरू होती. त्यावेळी युक्रेन येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी अडथळे येत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना सांगून बॉम्बफेक बंद करायला लावली. मोदी यांचे पुतीन यांनी ऐकले. ८ वर्षात अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. प्रतिष्ठा वाढली आहे. पूर्वी आपल् म्हणने कोणी ऐकत नव्हते, आता संपूर्ण जग गांभीर्याने ऐकत आहेत, असे राजनाथ सिंग यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com