अनौपचारिक शिक्षणावर अभ्यासक्रम

अनौपचारिक शिक्षणावर अभ्यासक्रम

पुणे - श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे एम. ए. (अनौपचारिक शिक्षण व विकास) अभ्यासक्रमाचे प्रवेश जाहीर केले आहेत. एसएनडीटी विद्यापीठाच्या पुण्यातील उपकेंद्रामार्फत यंदापासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.

अनौपचारिक शिक्षण आणि समाजशास्त्र याची सांगड या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून घालण्यात आली आहे. एसएनडीटी विद्यापीठात २०११पासून हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

मात्र विद्यापीठाच्या पुण्यातील उपक्रेंद्रात यंदापासून हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी ‘www.sndt.ac.in’ या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी २५ प्रवेश क्षमता  असणार आहे.

अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी अभ्यासक्रमात किमान ४५ टक्के गुण असणे अपेक्षित आहे. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमांत हा अभ्यासक्रम असणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यापीठ, बिगर सरकारी संघटना, उद्योग, शासकीय, संशोधन क्षेत्रातील निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, अनौपचारिक शिक्षण यामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होऊ  शकणार आहे.

शिक्षण आणि त्याचा प्रभाव समाजात तळागाळापर्यंत पोचत नाही. अभियान, योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सरकार अनौपचारिक शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. त्यामुळे या शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवू लागले आहे. अनौपचारिक शिक्षणात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. समाजात काहीतरी वेगळे करण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
- डॉ. भास्कर इगवे, सहायक प्राध्यापक, आजीवन अध्ययन आणि 
विस्तार विभाग, एसएनडीटी पुणे उपकेंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com