#MakePuneSafeबेकायदा होर्डिंगची माहिती दडवली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - संपूर्ण शहरात शेकडो बेकायदा होर्डिंग थाटले असतानाही त्यापैकी 117 होर्डिंग बेकायदा असल्याची नोंद ठेवणाऱ्या महापालिकेने दीडशे होर्डिंग पाडल्याचा दावा केल्याने महापालिकेच्याच कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. नेमक्‍या कोणत्या भागातील किती होर्डिंग पाडले, त्यांची स्थिती काय होती? याचीही माहिती दडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कारवाईचे आकडे फुगविले का, असाही प्रश्‍न यानिमित्ताने विचारला जात आहे. दरम्यान, यासंदर्भात सविस्तर अहवाल येत्या 14 डिसेंबरला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

शहरात आणि उपनगरांमध्ये सुमारे 1 हजार 880 अधिकृत होर्डिंगची नोंद आहे. याशिवाय केवळ 117 बेकायदा होर्डिंग असल्याचे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात मात्र बेकायदा होर्डिंगच संख्या सहा हजारांपर्यंत असल्याची माहिती महापालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली. तसेच, परवानगीपेक्षा अधिक आकाराचेही होर्डिंग उभारून होर्डिंग मालकांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे या खात्याच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. दरम्यान, मंगळवार पेठेत होर्डिंग कोसळल्यानंतर बेकायदा होर्डिंग पाडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये दीडशेहून अधिक होर्डिंग काढण्यात आले. तेव्हाच 117 बेकायदा होर्डिंग असल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने इतके होर्डिंग कोठून पाडले, असा प्रश्‍न आहे. मग, होर्डिंग पाडले, की फ्लेक्‍सचे आकडे या कारवाईत घुसडण्यात आले, असा संशय विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी व्यक्त केला. त्याबाबत खुलासा करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

""ज्या व्यावसायिकांनी होर्डिंगकरिता परवानगी घेतली नाही आणि ज्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले नाही, त्यांच्यावर कारवाई झाली आहे. शिवाय, परवानगी आणि प्रत्यक्षात होर्डिंगचा आकारही तपासण्यात आला असून, त्यात बदल असलेले होर्डिंगही काढले आहेत. ही मोहीम अजूनही सुरू आहे. यासंदर्भातील अहवाल मांडण्यात येईल.'' 
- विजय दहिभाते, प्रमुख, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग. 

पालिकेच्या रेकॉर्डनुसार बेकायदा होर्डिंग : 117 
कारवाई केलेले बेकायदा होर्डिंग : 150 

Web Title: Information about illegal hoardings