"पुणे ट्रॅफवॉच'वर मिळणार शहरातील वाहतुकीची माहिती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

पुणे - नागरिकांना शहरामध्ये प्रवास करणे अधिकाधिक सोपे जाण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे वाहतूक व्यवस्थेची माहिती देणारे "पुणे ट्रॅफवॉच' हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. त्याद्वारे रस्त्यावरील गर्दी, पार्किंगची ठिकाणे यांसारखी माहिती नागरीकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

शहर वाहतूक विभाग, चेंजभाई व स्मार्ट सिटी यांच्या संकल्पनेतून हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. संकेतस्थळासाठी चेंजभाई या संस्थेने विशेष काम केले आहे. संकेतस्थळाचे अनावरण पोलिस आयुक्त कार्यालयात करण्यात आले. या वेळी वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित संकेतस्थळावर "फोटो ऑटो टॅगिंग' असणारा देशातील हा पहिला प्रकल्प असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

याबाबत मिळणार माहिती 

* प्रमुख 47 रस्ते, 265 चौकांची माहिती 33 हजार फोटोंद्वारे मिळणार 
* रस्त्याचे नाव टाकल्यास रस्त्यावरील इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार 
* वाहतुकीची सद्यःस्थिती, खड्डे, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, पार्किंग आदी माहिती उपलब्ध 
* वाहतूक नियमांचे उल्लंघन होणारे चौक, वॉटर लॉगिंगचाही त्यामध्ये समावेश 
* "ब्लॅक स्पॉट'ची माहितीही एका क्‍लिकवर 

या वर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी खास वेबपेज तयार केले होते. त्याच पद्धतीने "पुणे ट्रॅफवॉच' हे संकेतस्थळ आहे. त्यावर नागरिकांना शहरातील रस्ते, वाहतुकीची सद्यस्थिती, पार्किंग, नो पार्किंग याबाबत माहिती मिळेल. 
-पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information on city traffic will be available on Pune Traffic Watch