धावपळ टाळण्यासाठी पोलिसांकडून सूचना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच वारजे-कर्वेनगर प्रभागातील महापालिका सहायक आयुक्त कार्यालयाबाहेर विविध पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरवात झाली होती. गर्दी वाढल्यानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. अखेरच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी पोलिस कर्मचारी वेळोवेळी सूचना देत होते.

काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासह इतरही काही पक्षांच्या, तसेच काही अपक्ष उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केले. दुपारी एक ते तीन या वेळेत सर्वाधिक अर्ज दाखल झाले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी आवश्‍यक असणारे अ आणि ब नमुना अर्ज नसतानाही अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज परस्पर दाखल केल्याचेही या वेळी पाहायला मिळाले.

अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या क्षणी हजर होत होते. त्यामुळे तीन वाजता प्रवेश बंद होण्याच्या वेळीही कक्षात गर्दी पाहायला मिळत होती.

संकेतस्थळ ‘हॅंग’, उमेदवारांचा जीव टांगणीला !
अर्ज दाखल करताना विविध कागदपत्रांची पूर्तता करतानाच ‘ऑनलाइन’ भरलेल्या अर्जात काही चूक झालेली असल्यास त्यात दुरुस्ती करून द्यावी लागते; मात्र अनेक उमेदवारांची माहिती एकावेळी साठल्यामुळे आयोगाचे संकेतस्थळच ऐनवेळी ‘हॅंग’ झाल्याचे काही प्रसंगही आज घडले. यामुळे अनेक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता.

Web Title: Information from police to candidate