वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांची अभिनव कल्पना

मिलिंद संगई
गुरुवार, 4 एप्रिल 2019

बारामती - शहरातील वाहतूकीला शिस्त लागावी व अस्ताव्यस्त लावलेली वाहने पटकन रस्त्यातून बाहेर निघावीत यासाठी शहर पोलिसांनी अभिनव कल्पना अंमलात आणली आहे. पोलिस पिंजरा गाडीला कर्णा बसवून त्यात पोलिस कर्मचारी बसून गाडी नंबर पुकारून ते वाहन रस्त्यातून काढण्यासाठी सूचना करतात. 

वारंवार सूचना करुनही वाहन रस्त्यातून निघाले नाही तर त्या वाहनचालकावर कारवाई केली जाते, मात्र आपल्या वाहनाचा क्रमांक पुकारल्यानंतर संबंधित मालक धावतपळत गाडी काढण्यासाठी येतो. 

शहरातील अनेक अरुंद रस्त्यावर चार चाकी व दुचाकी वाहने मन मानेल तशी पार्क केलेली असतात, अशा वाहनचालकांवर या पुढील काळात कारवाई तीव्र करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्ते मोकळे राहिले पाहिजेत व वाहतूक सुरळीत असावी असा पोलिसांचा प्रयत्न असून यात नगरपालिकेचेही सहकार्य घेतले जात असल्याचे पाटील यांनी नमूद केले. 

Web Title: Innovative idea of ​​police to discipline traffic