'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम

दत्ता म्हसकर
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

जुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव उपक्रम राबवित आहेत. गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थिनीं स्वतः राख्या बनवून सैनिकांना पाठवत असतात. शाळेत रक्षाबंधन निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात माजी सैनिक सुनिल कुलवडे व प्रा.बाबासाहेब माने यांना राखी बांधण्यात आली. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी श्रेयस शेटे याचा सत्कार करण्यात आला. 

शालेय विद्यार्थिनीं गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम करत असून सैनिक बांधव त्यांना पत्र पाठवून कौतुक करतात असे मुख्याध्यापिका गायत्री काजळे यांनी सांगितले. शालेय शिस्तीचे जीवनात असलेले महत्त्व व आहारा विषयी प्रा.माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 'देशसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यासाबरोबर खेळालाही महत्व द्यावे, 'देशसेवेचे बाळकडू हे शालेय जीवनातुनच विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे, तरच भावी सैनिक तयार होतील' असे कुलवडे यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सविता कुलवडे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: An innovative venture of Junnar students for 'A dhag shaurya'