आयएनएस अजय बत्तीस वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

INS Ajay

भारतीय नौदलात 32 वर्षांची सेवा केल्यानंतर आयएएस अजय हे नौदलाचे जहाज सोमवारी (ता. १९) सेवानिवृत्त झाले.

आयएनएस अजय बत्तीस वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त

मुंबई - भारतीय नौदलात 32 वर्षांची सेवा केल्यानंतर आयएएस अजय हे नौदलाचे जहाज सोमवारी (ता. १९) सेवानिवृत्त झाले. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे पारंपरिक समारंभात या जहाजाला निरोप देण्यात आला.

हा सोहळा पश्चिमी नौदल मुख्यालयाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग तसेच आयएनएस अजय या जहाजाचे पहिले कमांडिंग ऑफिसर व्हाइस अॅडमिरल ए जी थापलियाल (निवृत्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

आयएनएस अजय २४ जानेवारी १९९० रोजी पोटी, जॉर्जिया. हे जहाज महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या ऑपरेशनल नियंत्रणाखाली २३ पॅट्रोल व्हेसल स्क्वाड्रनचा भाग होते. हे जहाज नौदलात ३२ वर्षांहून अधिक काळ सक्रिय होते. आपल्या गौरवशाली सेवाकार्यकाळात, कारगिल युद्धादरम्यान ऑपरेशन तलवार आणि २००१ मध्ये ऑपरेशन पराक्रम यासह अनेक नौदल मोहिमांमध्ये भाग घेतला.

या समारंभात सैन्यदल, हवाईदलातील अधिकारी, तसेच जहाजावरील आजी-माजी कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंब उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी जहाजाने नौदलात केलेल्या अमूल्य सेवेवर प्रकाश टाकला.

Web Title: Ins Ajay Navy Ship Retired

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneIndian Navy