esakal | pUNE : गणेशोत्सवातून स्वराज्याची प्रेरणा
sakal

बोलून बातमी शोधा

PUNE

गणेशोत्सवातून स्वराज्याची प्रेरणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ब्रिटिश राजवट आल्यानंतर लोकमान्य टिळक हे भारताचे पहिले नेते म्हणून ओळखले गेले. स्वातंत्र चळवळ उभी करताना उत्सवाचा उपयोग करता येईल, ही कल्पना त्यांना सुचली व गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. याच गणेशोत्सवातून स्वराज्याची प्रेरणा सामान्यांना मिळाली असून, राष्ट्राभिमान जागविण्याचे काम गणेशोत्सवाने केले,’’ असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

पार्वती चव्हाण सोशल फाउंडेशन आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठतर्फे ‘विघ्नहर्ता कृतज्ञता सन्मान’ सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, निवृत्त पोलिस अधिकारी मारुतीराव देशमुख, फाउंडेशनचे संस्थापक गणेश चव्हाण, ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शाह, नितीन यंदे, अमर राव आदी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, ‘‘गणपतीची उपासना आणि विद्या व कलेची जोपासना गणेशोत्सवाने केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत विद्या व कलेची जोपासना या उत्सवात झालेली दिसून येते. यामुळे आपल्याला उत्तम ज्ञान मिळत आहे. याशिवाय गणेश मंडळांच्या वतीने समाजसेवा देखील होत आहे.’’

गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्थिर पाण्याचे हौद, फिरत्या हौदांची तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था करणाऱ्या आठ गणेशोत्सव मंडळांना विघ्नहर्ता कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. यामध्ये अष्टविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी, वाघजाई मित्र मंडळ फाउंडेशन जनता वसाहत, हिंदमाता तरुण मंडळ नाना पेठ, देशप्रेमी मित्र मंडळ कोथरूड, युगंधर मित्र मंडळ आनंदनगर आदींचा समावेश आहे.

loading image
go to top