व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्याचे व्रत

Aditi-Lohakare
Aditi-Lohakare

एका खूप मोठ्या शहरातून मंचर ह्या छोट्याशा गावात असा माझा प्रवास खूप विलक्षण आहे. वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कामाचा अनुभव घेऊन मंचरला सिद्धकला हॉस्पिटलमध्ये आले. या प्रवासात माझे पती डॉ. नरेंद्र विजय लोहोकरे यांचे सशक्त पाठबळ मला मिळत आहे. 

मुंबई... एका खूप मोठ्या शहरातून मंचर ह्या छोट्याशा गावात असा माझा प्रवास खूप विलक्षण आहे. मुंबईत बी. कॉम पूर्ण केले. आणि NMIMS ह्या अतिशय नावाजलेल्या महाविद्यालयातून ‘मानव संसाधन व्यवस्थापन आणि विकास’(Human Resource Management & Development)  हा विषय घेऊन एम. बी. ए. केले. एफ. एम. सी. जी. वित्त (finance) बांधकाम, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कामाचा अनुभव घेऊन मंचरला सिद्धकला हॉस्पिटलमध्ये आले. मुंबईपेक्षा इथे अतिशय वेगळं वातावरण होतं. इथे काम करताना जाणवले की इथे विचार करण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, वागण्या बोलण्याची पद्धत, शहरापेक्षा अतिशय वेगळी होती. आणि माझ्यासमोर हे मोठेच आव्हान होते. मोठ्या शहरातल्या माझ्या कामाच्या अनुभवाचा उपयोग ग्रामीण भागातील माझ्या सहकाऱ्यांना करून द्यायचा हे मात्र मी मनाशी निश्‍चित केले होते. 

सर्वप्रथम सिद्धकला हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हॉस्पिटलच्या ध्येय व उध्दिष्ट्याप्रती व्यावसायिक दृष्टिकोन (Vision) विकसित करणे गरजेचे होते. रुग्णांच्या प्रती अतिदक्ष सेवा देण्यास सिद्धकला हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी कटिबद्ध आहेत हे सिद्धकला हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे ध्येय व उद्दिष्ट आहे. हे ध्येय आणि उद्दिष्ट्य साध्य करण्याकरिता हॉस्पिटलमधील सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना सातत्याने विविध विषयांत प्रशिक्षण देत राहणे आणि त्यांच्या ज्ञानाचा आलेख सातत्याने उंचावत ठेवणे गरजेचे वाटले. त्याची पूर्तता करताना सुरवात अर्थातच डिजिटल सुधारणांनी केली. अद्ययावत ‘हॉस्पिटल-मॅनेजमेंट सॉफ्टवेअर’ घेतले. अगदी हार्डवेअर शिकवण्यापासून ते सॉफ्टवेअर वापरण्याचे शिक्षण जातीने दिले. तसेच विविध वैद्यकीय विषयांव्यतिरिक्त संभाषण कौशल्य, मानसशास्त्र अशा वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण विषयांचे प्रशिक्षण विषयतज्ञांकडून नियमितपणे घडवून आणले. ‘शिक्षणातील सातत्य हाच उन्नतीचा पाया आहे’  हे माझे वैयक्तिक मत आहे.

कुठल्याही व्यक्तीचे विचारक्षेत्र आणि कार्यक्षेत्र हे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. आणि व्यक्तिमत्त्व हे संस्कारांवर अवलंबून असते. विचारक्षेत्र विकसित करण्यासाठी लागणारे जीवन कौशल्य हा संस्कारांचा भाग असतो आणि तो शिकावाही लागतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जीवन कौशल्य वापरण्याची योग्यता ही मिळवणे गरजेचे असते आणि त्याकरिता विविध विषयांचे औपचारिक प्रशिक्षण लागते. ही जाणीव ठेवून अशा प्रकारच्या कार्यशाळा मी अनेक शाळा, महाविद्यालयात घेते. तसेच अनेक औद्योगिक समूहातील (इंडस्ट्री) अनेक संस्थांमध्ये संस्थात्मक परिवर्तन घडवून आणण्याकरिता कामगारांना अशा प्रकारच्या जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण गरजेचे असते. जीवनकौशल्यांचे विविध विषयांचे प्रशिक्षण मी नियमितपणे देत असते. 

घर आणि व्यावसायिकता सांभाळताना आज माझ्या ह्या प्रवासात माझे स्फूर्तिस्थान, माझे पती डॉ. नरेंद्र विजय लोहोकरे ह्यांचे सशक्त पाठबळ मला मिळत आहे. आणि सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य अशा या सांघिक प्रयत्नामुळे मी कार्यरत राहू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com