गृहिणी ते उपनगराध्यक्षा

Alka-Fulpagar
Alka-Fulpagar

नेते वल्लभ बेनके यांनी उमेदवारी दिली, साहेबांनी दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ केला. मी मागासवर्गीय असूनसुद्धा तीन वेळा खुल्या वर्गातून निवडून आले. आताही माझ्या विभागात अनेक विकासकामे सुरू असून, जुन्नर शहरात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर माझा प्रभाग आहे.

माझा जन्म जुन्नर येथे झाला असून, कुटुंबात आई-वडील आणि पाच भावंडे असा परिवार होता. वडील मुंबईला नोकरी करत होते आणि आई जुन्नर पालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यातूनही सगळ्या भावंडांना थोड्याफार प्रमाणात शिक्षण घेता आले व माझे अकरावीपर्यंत शिक्षण झाले. अकरावी झाल्यानंतर जुन्नर मध्येच वास्तव्यास असणारे शिवाजी महादेव फुलपगार यांच्यासोबत माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर घरातील कामे, शेतीवरील कामे, लाकूड फाटा गोळा करणे अशी अनेक कामे त्या वेळी केली. माझे सासरे महादेवराव फुलपगार हे तलाठी म्हणून काम करत होते. ते सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी रेशनिंगचे दुकान चालवायला घेतले. माझे लग्न झाले तेव्हा माझे पती नोकरीस नव्हते. आम्हाला तीन मुले झाल्यानंतर ते नोकरीस लागले.

तोपर्यंत आमचा सांभाळ माझ्या सासऱ्यांनीच केला. सासरे दूरदृष्टीचे असल्याने ते मला मदतीसाठी रेशनिंग दुकानात नेत असत. त्यांच्या निधनानंतर ते दुकान मी ३५ वर्षे चालवले व संसारास हातभार लावला. या दुकानाचे काम करत असताना खऱ्या अर्थाने मी बाहेर पडले व बाहेरचे जग तेव्हा मला समजू लागले. माझ्या बोलण्यात धीटपणा आला आणि दुकानाच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयाचा संबंध आला; त्या माध्यमातून मी लोकांची कामे करू लागली. १९९६ मध्ये जुन्नर पालिकेचा वार्ड सर्वसाधारण महिला घोषित झाला. मी स्वतः मागासवर्गीय असूनसुद्धा लोकांनी मला त्या विभागात उभे केले आणि निवडूनही दिले. गावकुसाबाहेर राहत होतो, दलित वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, गटार बाकीच्या सोईसुविधा कधीच पोचत नव्हत्या हे वर्षानुवर्षे पाहत आले होते. मी निवडून आल्यानंतर प्रथम दलित वस्तीत सुधारणा केली. त्यात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन, वीज, रस्ते अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या.

नगरपालिकेत वारसा हक्काच्या रिक्त जागा भरल्या जात नव्हत्या त्यासाठी लढा देऊन त्या जागा भरल्या. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना प्रशिक्षण दिले. अशी अनेक कामे केली आणि त्या कामाची पावती म्हणून लोकांनी आणि जुन्नर तालुक्‍याचे भाग्यविधाते माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेब यांनी २००६ साली सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादी पक्षाचे तिकीट दिले. या निवडणुकीत मी निवडून आले. त्या वेळेस पण रस्ते काँक्रिटीकरण, समाज मंदिराचे व विहाराचे सुशोभीकरण, सोलर दिवे अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिला सक्षमीकरण करण्यासाठी कार्य केले. या कामाची पावती म्हणून मला पुणे येथील बंधुता प्रतिष्ठान या संस्थेने प्रेरणा पुरस्कार दिला. टाटा समाज विज्ञान संस्थेने मानपत्र देऊन माझा गौरव केला. १९९६ साली नगरपालिकेत गेल्यावर ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी महान कार्य केले, त्या सावित्री मातेची जयंती जुन्नर शहरात मी सुरू केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन ती आजतयागत चांगल्या प्रकारे निभावली. जुन्नर शहरात महिलांचे संघटन असावे म्हणून राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाची स्थापना केली. त्यात सर्व स्तरातील महिलांचा समावेश आहे.

या माध्यमातून राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले जयंती तसेच ८ मार्च महिला दिन साजरा करत असतो. तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अनेक महिलांना प्रशिक्षण दिले. तसेच महिलेवर अन्याय झाल्यास हा मंच त्या महिलेस बळ देतो. ही कामे करत असताना २०१६ साली सर्वसाधारण गटातून मी भरघोस मतांनी निवडून आले. तालुक्‍याचे युवा नेतृत्व अतुल बेनके यांनी मला उपनगराध्यक्षपद दिले. सर्वसाधारण वॉर्डातून मागासवर्गीय महिलेला
नेते वल्लभ बेनके यांनी उमेदवारी दिली साहेबांनी दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ केला. मी मागासवर्गीय असूनसुद्धा तीन वेळा खुल्या वर्गातून निवडून आले. तसेच तीन वेळा निवडून जाण्याचा पहिला बहुमान मला मिळाला. आताही माझ्या विभागात अनेक विकासकामे सुरू असून, जुन्नर शहरात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर माझा प्रभाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com