ज्वेलरी व्यवसायातूनच सामाजिक बांधिलकी

Kavita-Dumbare
Kavita-Dumbare

‘चैतन्य ज्वेलर्स’ या आमच्या दुकानात व्यवसाय कसा केला जातो, याचे अवलोकन करता करता व्यवसायातील बारकावे समजू लागले. नवीन नवीन डिझाईन दाखवून महिलांशी चर्चा करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची भक्कम साथ असते. ओतूर (ता. जुन्नर) येथील सोने व्यापारात एक विश्वासार्ह व नावाजलेले नाव म्हणजे संतोष वसंत डुंबरे यांचे ‘चैतन्य ज्वेलर्स’.

‘यत्र नार्यस्तु पुजन्ते रमन्ते तत्रदेवता’ या उक्तीप्रमाणे माझ्या घरात आजपर्यंत स्त्रियांचा सन्मानच राखला गेला. माझा जन्म संगमनेर तालुक्‍यातील राजापूर येथे झाला. महसूल विभागात कार्यरत असणारे माझे वडील कै. शांताराम माधव हासे हे प्रेमळ, पण तेवढेच करड्या शिस्तीचे होते. त्यांच्या संस्कारात आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यांच्याकडून प्रामाणिकपणे व सचोटीने काम करण्याचे बाळकडू आम्हा भावंडांना मिळाले.

पदवीपर्यंत संगमनेरला शिक्षण झाल्यानंतर १७ मे २००२ रोजी संतोष डुंबरे बरोबर विवाहबद्ध होऊन धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या ओतूरमध्ये आले. संतोष डुंबरे यांचे एकत्रित मोठे कुटुंब, त्यात वसंत बाबूराव डुंबरे व ताराबाई वसंत डुंबरे हे सासूसासरे व सर्वचजण आपुलकीने वागणूक देत. त्यामुळे वर्षभरात सर्व कुटुंबात समरस झाले. त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव आणि आवडीनिवडी समजल्या एक आदर्श गृहिणीसाठी आवश्‍यक सर्व गोष्टी आपोआपच आत्मसात झाल्या. संसार वेलीवर अंजलीच्या रूपाने आनंद बहरू लागला. अंजली मोठी होऊ लागली त्यामुळे मी पतिराजांना व्यवसायात साथ देण्याचे ठरवले. सुरवातीला ‘चैतन्य ज्वेलर्स’ या आमच्या दुकानात व्यवसाय कसा केला जातो, याचे अवलोकन करताकरता व्यवसायातील बारकावे समजू लागले. या व्यवसायाशी महिलांचा जास्तीत जास्त संबंध येत असल्याने नवीन नवीन डिझाईन दाखवून महिलांशी चर्चा करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. प्रथम छोट्या स्वरूपात असलेले आमची सोन्याचांदीची पेढी आज दोन मजली सुसज्ज इमारतीत सुरू असून, सोने चांदीच्या दागिन्यांच्या शोरूममध्ये रूपांतरित झाले आहे. व्यवसाय ही कोणत्याही एका समाजाची मक्तेदारी नसून सचोटी व प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यास यश हमखास मिळते, हा आमचा अनुभव आहे.

‘चैतन्य ज्वेलर्स’चा व्यवसाय करत असताना ‘चैतन्य कम्युनिकेशन मोबाईल शॉपी’ हा नवीन व्यवसाय चालू केला व त्यालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला; तसेच चैतन्य ज्वेलर्समध्ये आम्ही सन २०१८ पासून फक्त ९१६ H.M. दागिने विकण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही फक्त हॉलमार्कचेच दागिने विकतो. त्यामुळे ग्राहकांचाही प्रतिसाद खूपच चांगला मिळत आहे.

व्यवसायवाढीसाठी वर्षभरात विविध बक्षीस योजनांचे आयोजन आम्ही करतो. तसेच २८ जानेवारी चैतन्य ज्वेलर्सच्या वर्धापनदिनी दरवर्षी महिलासाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यास उदंड प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी व व्यवसाय वृद्धी दोन्ही ही ध्येय साध्य होतात. सामाजिक भान असलेल्या आमच्या कुटुंबात समाजोपयोगी कार्य करण्याची पद्धत पूर्वीपासून आहे. त्यात माझा हिरिरीने सहभाग असतो. ‘सकाळ उद्योग समूहा’च्या ओतूर येथील तनिष्का गटाची मी सभासद असून या गटामार्फत विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन मी आपली सामाजिक बांधिलकी जपलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com