कुटुंब व समाजालाही ‘नानीं’चा आधार

Rajashri-Benake
Rajashri-Benake

समाजकारणाची धुरा सांभाळत असताना आई म्हणूनही आपल्या तीनही मुलांवर उत्तम संस्कार केले. राजकीय वलयापासून दूर ठेवत मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करण्यासाठी सक्षम बनविले. सासू, सुनेच्या नात्याच्या पलीकडे जाऊन तिन्ही सुनांना संसाराच्या रहाटगाडग्यात मुळीच अडकवून ठेवले नाही. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच तिघीही पतीसमवेत आपापल्या क्षेत्रांत ठसा उमटवत आहेत.

जुन्नरचे भाग्यविधाते वल्लभशेठ बेनके यांच्या सुविद्य पत्नी राजश्रीताई बेनके या ‘नानी’ म्हणून ओळखल्या जातात. जुन्नर तालुक्‍यातील नारायणगावातील एका साधारण कुटुंबात त्यांचा २१ डिसेंबर १९५४ ला जन्म झाला. कोकणे कुटुंबात लहानाचे मोठे होत असताना आई-वडिलांकडून माणसे जोडण्याची कला आपसूकच त्यांना अवगत झाली. त्या काळातील चालिरीतीप्रमाणे वयाच्या २१व्या वर्षी त्यांचा वल्लभ बेनके या उच्चशिक्षित व सधन कुटुंबातील तरुणाशी विवाह झाला. मनमिळाऊ व सरळ स्वभावामुळे त्यांनी सासरच्यांनाही लवकरच आपलेसे केले. बेनकेसाहेबांचा व्यवसाय असो वा राजकीय कारकीर्द, संपूर्ण प्रवासात त्यांच्या खाद्याला खांदा लावून नानींनी प्रत्येक सुख-दुःखात साथ देऊन पत्नी धर्म निभावला. जेव्हा लोक बेनकेसाहेबांच्या तडफदार स्वभावामुळे त्यांच्या जवळ जाण्यास बिचकत, तेव्हा मवाळ स्वभावाच्या नानी त्यांना आपले प्रश्न सांगण्यासाठी जवळच्या वाटत. काम करीत त्यांनी जनसंपर्क वाढविला. साधे सरळ राहणीमान असणाऱ्या आमदारीणबाई पाहतापाहता आमदारांएवढ्याच जनतेच्या लाडक्‍या झाल्या. 

सुनांना भक्कम साथ
समाजकारणाची धुरा सांभाळत असताना आई म्हणूनही आपल्या तीनही मुलांवर उत्तम संस्कार केले. राजकीय वलयापासून दूर ठेवत मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करण्यासाठी सक्षम बनविले. राजकीय भाषणांमध्ये सावित्रीबाईंचा दाखला बरेच जण देत असतात. मात्र, सुनांबाबतही हे सावित्रीचे वाण नानींनी लीलया पेलले. सासू, सुनेच्या नात्याच्या पलीकडे जाऊन तिन्ही सुनांना फक्त संसाराच्या रहाटगाड्यात मुळीच अडकवून ठेवले नाही. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच तिघीही पतीसमवेत आपापल्या क्षेत्रांत ठसा उमटवत आहेत. डॉ. अमोल व डॉ. पल्लवी या युनिकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा करतात. श्री. अतुल व सौ. गौरी या ज्ञानदा शिक्षण संस्था व राजकीय क्षेत्रातून समाजसेवा करतात. तर, श्री. अमित व सौ. धनश्री या कृषी व्यवसाय व कांदळी उद्योग वसाहतीच्या माध्यमातून लोकसेवेचे काम चोखपणे बजावतात. 

वात्सल्यपूर्ण आजी
मुत्सदीपणाने समाजकारणातील वेगवेगळ्या भूमिका निभावणाऱ्या नानी नातवंडासोबत मात्र स्वतःलाही विसरून जातात. एका वात्सल्यपूर्ण आजीची भूमिका उत्कृष्ट निभावतात. शालेय जीवनात खो-खो चॅम्पियन असणाऱ्या नानींचा चपळता व सहजता हा व्यक्तिमत्त्वाचाच भाग झाला. वयाच्या चौसष्टाव्या वर्षीदेखील व्यायाम करण्याची आवड व कामाची लगबग बघून विशीतली तरुणीही अवाक होईल. ज्ञानदा शिक्षण संस्था व श्रीराम पतसंस्था यांचे अध्यक्षपद भूषवीत असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. कुटुंबाचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक व आधार बनल्या. त्यांच्या राजश्री नावाला साजेसे त्या कित्येकांच्या मनावर आज अधिराज्य गाजवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com