एलआयसीमुळे जीवनाला दिशा

प्रा. साधना गोपीनाथ सैद
गुरुवार, 14 मार्च 2019

एलआयसीद्वारे स्वतःच्या पायावर स्वयंपूर्णपणे उभी आहे. अर्थसाधना हे मंचरला कार्यालय, दोन कार, स्वतःचे घर आहे. एक मुलगा टाटा मोटर्समध्ये तर दुसरा राजस्थानातील कोटा येथे आयआयटीसाठी शिक्षण घेतोय. सासर व माहेरची मी आजही लाडकी आहे.

एलआयसीद्वारे स्वतःच्या पायावर स्वयंपूर्णपणे उभी आहे. अर्थसाधना हे मंचरला कार्यालय, दोन कार, स्वतःचे घर आहे. एक मुलगा टाटा मोटर्समध्ये तर दुसरा राजस्थानातील कोटा येथे आयआयटीसाठी शिक्षण घेतोय. सासर व माहेरची मी आजही लाडकी आहे.

काले (ता. जुन्नर) येथे १७ जुलै १९८० मध्ये कुटुंबात दुसरीही मुलगीच म्हणून जन्म झाला. गावात चौथीपर्यंत शिक्षण झाले. दहावीपर्यंत आणि लग्न होऊन सासरी जाईपर्यंत रवानगी जुन्नर येथे चुलत्यांकडे झाली. काही कळायला लागायच्या आतच लग्न गिरवली (ता. आंबेगाव) येथील गोपीनाथ दादाभाऊ सैद यांच्याशी (१० मे १९९६) रोजी झाले. पाच सासू-सासरे असणाऱ्या ४५ माणसांच्या कुटुंबात मोठी सून म्हणून आले. सासरी मिळणाऱ्या प्रेमाने आणि आदराने सगळी कामे शिकले. शेतातील सर्व कामे केली. माझे भविष्य काय? शिकून फार मोठे व्हायचे होते. पती व्यवसायासाठी मुंबईला आणि मी गिरवलीला. बरोबरीच्या मुली शिकतच होत्या. मी संसारात अडकलेली. हे शल्य बोचत होते. मन धीट करून पुढे शिकण्याची परवानगी सासऱ्यांकडे मागितली. त्यांनी एक महिन्याने परवानगी दिली. शिकायला मिळणार या कल्पनेने आनंद झाला. घोडेगावच्या कनिष्ट महाविद्यालयात शिक्षण सुरू झाले.

घरातील कामे करून शिक्षण, रात्री अभ्यास. बारावीचा शेवटचा पेपर दिल्यावर शुभम हे पुत्ररत्न झाले. नंतर शिवम. आर्थिक समस्याही उभ्या राहू लगल्या. माझ्या आणि कोवळ्या मुलांच्याही भविष्याबद्दल अंधार दिसू लागला. त्यातच पतीही मुंबई सोडून गावी आलेले. परिस्थिती माणसाला खूप शहाणी बनवते. एमएएमएड झाले.

वाघिरे कॉलेज ओतूर, बीएड कॉलेज घोडेगाव, मंचरचे बीएड कॉलेज, भारती विद्यापीठ पुणे. शिक्षण क्षेत्रात नोकऱ्याही केल्या. जीवनात हार मानली नाही. संघर्ष करतच राहिले. पुण्याहून एलआयसी एजन्सीबद्दल माहिती मिळाली होती. विकास अधिकारी रघुनाथ काकडे यांच्या मंचर येथील लाइफ प्लस कार्यालयात गेले. आयआरडीएची परीक्षा पास झाले. एलआयसी प्रतिनिधी बनले. माझे गुरू काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास करून ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या. आर्थिक संपन्नतेचा प्रवास सुरू झाला. ग्राहक विमेदार माझी शक्ती व ऊर्जा आहेत. माझ्या गुरुनीं मला इथल्या मातीत सत्कार्य रुजविण्यास शिकविले. वेळेत पैसे देणाऱ्या एलआयसीने आर्थिक शिस्त शिकविली. मान अपमान पचवायला आणि घाव सोसायला मला विमेदारांनी शिकविले. कुटुंबाच्या आनंदाचे संरक्षण, उत्पन्न कराचे नियोजन, उतार वयाला पेंशन, मुला मुलींचे शिक्षण आणि लग्नाचे नियोजन यात माझा हातखंडा झालाय. कुटुंबासाठी संपूर्ण आर्थिक शिस्त कशी आणायची यात मला आनंद मिळतो. 

एलआयसीद्वारे स्वतःच्या पायावर स्वयंपूर्णपणे उभी आहे. अर्थसाधना हे मंचरला कार्यालय, दोन कार, स्वतःचे घर आहे. एक मुलगा टाटा मोटर्समध्ये तर दुसरा राजस्थानातील कोटा येथे आयआयटीसाठी शिक्षण घेतोय. सासर व माहेरची आजही लाडकी आहे. गुरगाव दिल्ली येथील एमडीआय या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेतही धडे घेतलेत. ९०० कुटुंबाचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी सतत कष्ट घेत आहे. ग्राहकांच्या सहयोगाने सतत तीन वर्ष एमडीआरटी हे जागतिक मानांकन प्राप्त करत आले. अमेरिकेत मियामी या जागतिक परिषदेला जाण्याची संधी मिळणार आहे. यशाची अनेक शिखरे मला हस्तगत करायची आहेत. यश मला माझे ग्राहक असणारे विमेदारच मिळवून देणार आहेत. माझ्या विमेदारांच्या ऋणातच मी राहील.

Web Title: Inspirational story of Sadhana Said on the occasion of womens day