स्वयंरोजगाराची दिशा दाखवणारी दुर्गा

Shubhangi-Aavate
Shubhangi-Aavate

केवळ चूलमूलच नाही तर मी माझ्या कुटुंबासाठी हातभार लावू शकते, याचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. घरातच सुरू केलेला हा लघू उद्योग स्वयंरोजगार देणारा आणि समाजात माझ्यासारख्या गृहिणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रीला प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे.

लग्न झाल्यानंतर मी काही वर्षे गृहिणीच होते. मुले मोठी झाली आणि शाळेत जाणे, अभ्यास करणे स्वताच करू लागली. यामुळे मला कुटुंबापासूनच्या कामातून आता जो काही वेळ मिळत होता तो व्यवसायात कारणी लागावा, असे मला मनोमन वाटत होते. पती भागवत आवटे आणि सासरे ह.भ.प. नारायण आवटे, वडिल हरिभाऊ दिवेकर व भाऊ यांनी निव्वळ प्रोत्साहनच दिले नाही, तर मला तसा उद्योगही उभारून दिला. माझे पती भागवत नारायण आवटे यांचा सॉ मिल आणि लाकडी वस्तू बनविण्याचा उद्योग आळंदीतच घराशेजारी आहे. यामुळे मी त्यांना तशी मदत करते. मात्र माझा स्वतंत्र व्यवसाय असावा म्हणून मला पति भागवत आवटे आणि सासरे ह.भ.प. नारायण आवटे यांनी निव्वळ प्रोत्साहनच दिले नाही तर मला तसा उद्योगही उभारून दिला. शेतीतील आणि लाकडापासूनच्या टाकाऊ मालापासून रोजच्या वापरातील ज्वलनशील इंधन म्हणून समजले जाणारे वुडन पिलेटस बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आणि सध्या जोरात सुरू आहे. घर आणि प्रापंचिक जबाबदारी सांभाळून एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी खूप जादा काही करू शकते हे मला माझ्या व्यवसायामुळे शिकायला मिळाले.

माझे माहेर जुन्नर तालुक्‍यातील आर्वी गावचे. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाले आणि माझे लग्न आळंदीतील वारकरी सांप्रदायातील आवटे कुटुंबीयांशी झाला. यामुळे घरात सांप्रदायिक माणसांचा राबता असल्याने घरकामातून वेळ मिळत नव्हता. त्यातच माझे पति भागवत आवटे यांचा लाकडाशी संबंधित व्यवसाय असल्याने आणि भाजपा सारख्या पक्षाचे ते आळंदी शहराध्यक्ष म्हणून काम करत असल्याने त्यांच्याही कामात मला हातभार लावावा लागत होता. लाकडाची वखार, सॉ मील आणि लाकडी उत्पादन बनविण्याच्या कामामुळे आम्ही आवटे कुटुंबीय सतत कामात मग्न असतो.

काम करत असताना आमच्या लक्षात आले की, टाकाऊ माल जास्त शिल्लक राहतो.आणि त्याचा विनियोग कसा करायचा याचा विचार आम्ही करत होते. आणि आम्ही लाकडी भुश्‍यापासून वूडन पिलेट्‌स बनविणे सुरू केले. पतीच्या व्यवसायात लक्ष दिल्यामुळे व्यवसाय कुशल कामाची आवड मला निर्माण झाली. सतत काही तरी नविन करायचे हा माझ्या पतीचा शिरस्ता होता.

यामुळे मला व्यवसायातील आर्थिक गणितापासून व्यवसायाचे उत्पादन आणि मार्केटिंगची कला अवगत झाली. दोन वर्षांपूर्वी सन २०१६ साली मी हा शेतीपूरक आणि घराशी निगडीत व्यवसाय माझे राहते घरातच तळमजल्यावर सुरू केला. आर्थिक साहाय्य बॅंकेतून घेतले आणि दोन महिला कामगारांसह व्यवसाय करत आहे. शेतीतील टाकाऊ माल आणि लाकडाचा भुस्सा यापासून गोळी बनविण्याचे तंत्र मी शिकले आणि आता ते घरीच बनविते. याला इंग्रजीत वुडन पिलेटस म्हणतात. शंभर टक्के इंधन म्हणून वापरले जाते. ९८ टक्के ती जळते आणि उर्वरित २ टक्के राख तयार होते. त्याचा धूरही होत नाही. यामुळे आरोग्याला धोका नाही. इतर कुठल्याही ज्वलनशील इंधनापेक्षा स्वस्त असल्याने घरगुती वापरासाठी किफायतशीर असे उत्पादन आहे. रोज साधारण प्रतितास साठ किलोचे उत्पादन होते.

उत्पादित माल हा सर्वसाधारणपणे खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपन्या आणि मोठ्या भट्ट्यांसाठी इंधन म्हणून वापरले जाते. आणि त्याठिकाणी मोठी मागणी आहे. घरातही स्वयंपाकासाठी स्वयंपाकाच्या गॅसपेक्षाही इंधन म्हणून वापरले तरी किफायतशीर आहे. सकाळी घरातील सदस्यांचे जेवण,नाष्टा उरकल्यानंतर दुपारच्या वेळेत मी या व्यवसायाकडे लक्ष देते.

यामुळे आता मी सतत कार्यमग्न राहत असून आरोग्याचे संतुलन राहण्यास मदत होते. याचबरोबर दोन पैसे उत्पन्न मिळाल्याचे समाधान वेगळेच.
केवळ चूलमूलच नाही तर मी माझ्या कुटुंबासाठी हातभार लावू शकते याचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. माझ्या घऱात मला याबाबत पूर्ण स्वातंत्र्य आहे. यामुळे घरातच सुरू केलेला हा लघू उद्योग स्वयंरोजगार देणारा आणि समाजात माझ्यासारख्या गृहिणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रीला प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे. मी माझ्या कुटूंबासाठी वेळेचा सदुपयोग करून काहीतरी हातभार लावू शकते याचे समाधान मला रोजच मिळत आहे. आणि त्यात मी माझे कुटुंबीय पूर्ण समाधानी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com