शिस्त, संस्कारातून यशाकडे वाटचाल

Sunita-Butte-Patil
Sunita-Butte-Patil

शिक्षण हेच एक असे माध्यम आहे की जेथे सर्वांना आपली क्षमता सिद्ध करता येते. अशा शिक्षण क्षेत्रातच आपण काहीतरी करावे हीच दांडगी इच्छा होती. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन उभारलेल्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

बदलणे हा बदलणाऱ्या जगाचा न बदलणारा नियम आहे, या युक्तीप्रमाणे सर्व क्षेत्रात झपाट्याने बदल घडत असताना जग डिजिटल होत आहे. यामध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतो, स्पर्धा करतो. मग यामध्ये अगदी जन्माला येणाऱ्या जीवापासून ते अगदी वयाच्या शंभरी पार केलेल्या ज्येष्ठापर्यंत, असे म्हणतात की, नभांगणातील चांदण्या मोजायच्या नसतात तर आपल्यावर त्याच छत आहे या आनंदात विहार करायचा असतो.

शिक्षण हेच एक असे माध्यम आहे की जेथे सर्वांना आपली क्षमता सिद्ध करता येते. अशा शिक्षण क्षेत्रातच आपण काहीतरी करावे हीच दांडगी इच्छा होती. कारण, यामध्ये संपूर्ण एक नवी पिढी घडविण्याची ताकद व उमेद आहे. योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन जर मिळाले तर खूप साऱ्या गोष्टी शक्‍य होतात. कारण आपलं आयुष्य आपणच आपल्या कर्तृत्वानं फुलवायचं असतं, सगळीच फुले मोहक असतात; परंतु आपण त्या फुलांमधली सुगंधी फुलं व्हायचं असते. खर तर २००९ मध्ये शरद बुट्टेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लर्निंग ट्री इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना करण्यात आली व या शिक्षणक्षेत्रात काम करण्याची संधी व जबाबदारी माझ्यावर आली. शाळा जरी इंग्रजी माध्यमाची असली तरी, माझी मातृभाषा मराठीचा मला सार्थ अभिमान आहे. शाळेमध्ये तिन्ही भाषा म्हणजेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या सर्व भाषांना समान महत्त्व दिले जाते. माझे तर स्पष्ट मत आहे की, सर्व मूळ संकल्पना जर आपल्या मातृभाषेत व्यवस्थित स्पष्ट झाल्या तर आपण कुठेही कमी पडत नाही.

शरद बुट्टेपाटील यांनी ज्या विश्वासाने शाळेची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची मी काळजी घेत असून तसा प्रयत्न करत आहे. कोणतेही काम एकट्याने करण्यापेक्षा सर्वांनी मिळून करण्यात खरा आनंद आहे. माझी शाळा ग्रामीण भागात आहे. ग्रामीण आणि शहरी अशी सांगड घालणे खर तर खूप अवघड गोष्ट आहे. शहरामध्ये ज्या सोयी-सुविधा आहेत त्यामानाने ग्रामीण भागात त्यांचा अभाव आहे.

विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे घडविणे अवघड होते, पण माझे शिक्षकही ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतात. शहराप्रमाणे सर्व गोष्टी माझ्या विद्यार्थांना मिळाव्यात, हा माझा अट्टहास असतो, त्याप्रमाणे प्रयत्नही चालू आहेत. थोड्याफार प्रमाणात आम्ही ते सुरूही केले आहेत. मुलांमध्ये जे सुप्त कलागुण आहेत त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे काम खरेतर आम्हा शिक्षकांचे आहे. शिक्षक होणे ही खरेतर सोपी गोष्ट नाही. प्रत्येक मुलावर वेगवेगळी मेहनत घ्यावी लागते, तीही वेगवेगळ्या प्रकारची. त्यानंतर जे मूल घडते त्याच समाधान शब्दांत व्यक्त करताच येत नाही. शाळेचे ब्रीदवाक्‍यच आहे की, ‘‘Creation of Confidence and personality’’. 

मुलांना अष्टपैलू कसे बनवता येईल याचाच विचार सतत चालू आहे. मला फार शिस्तप्रिय राहायला आवडते व तो गुण माझ्या विद्यार्थ्यांमध्ये कसा येईल, याचीही काळजी घेते. कारण जीवनाला जर योग्य शिस्त आणि संस्कार मिळाले तर जीवनात नक्कीच यशस्वी होता येते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझे आदर्श असणारे भारतीय संस्कृतीचे भाष्यकार स्वामी विवेकानंद व राजमाता राजर्षी जिजाऊ माँसाहेब यांच्या विचारांचे अनुकरण व प्रेरणा. सतत नावीन्याचा ध्यास, नवनवीन आव्हान पेलण्याची तयारी, शरद बुट्टेपाटील यांचे यशस्वी मार्गदर्शन व विश्वास, माझ्या बुट्टेपाटील व ठाकूर पाटील कुटुंबांचा पाठिंबा, जिद्द, चिकाटी, कामाविषयी सचोटी, प्रामाणिकपणा व प्रचंड मेहनत करण्याची तयारी यामुळे यशाकडे वाटचाल चालू आहे. त्याचीच परिणती म्हणजे मला माझ्या कामासाठी सन २०१५ मध्ये मिळालेला ‘राजमाता जिजाऊ’ सन्मान होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com