अधिकाऱ्यांच्या घरी पाणी मीटर बसवा - सजग नागरिक मंचाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Install water meters officials houses Citizen Forum demands Uniform Water Supply Schemes pune

अधिकाऱ्यांच्या घरी पाणी मीटर बसवा - सजग नागरिक मंचाची मागणी

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जेथे पाणी मीटर बसवले आहेत, तेथे प्रतिव्यक्ती प्रतिदिन १५० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरले तर कायदेशीर कारवाईचा इशारा महापालिकेने दिलेला असताना आता महापालिकेचे आयुक्त, महापौर बंगला व इतर कार्यालयांच्याच ठिकाणी पाणी मीटर बसवले नसल्याचे समोर आले आहे. आधी अधिकाऱ्यांच्या घरी मीटर बसवा, त्यांचा पाणी वापर किती हे स्पष्ट होऊ द्या अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली. आहे.

घरोघरी मीटर बसविल्यानंतर ज्या नागरिकांचा पाणीवापर दरडोई दर दिवशी१५० लिटर पेक्षा जास्त होत आहे त्यांना कायदेशीर कारवाईची नोटीस दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज माहिती अधिकार दिनात समान पाणीपुरवठा कार्यालय प्रमुखांकडे महापौर बंगला, आयुक्त निवास , अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, जिल्हाधिकारी बंगला या सर्व ठिकाणी दरडोई दर दिवशी किती पाणीवापर होतो याची माहिती मागण्यात आली. पण त्यावेळी या मिळकतीमध्ये अजून पाणी मीटर बसवले नाहीत असे उत्तर देण्यात आले, असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.

‘‘महापालिकेचे अधिकारी नागरिकांना सहकार्य करा म्हणतात, पण ते किती पाणी वापरतात हेच अजून तपासले जात नाही. हे आश्चर्यकारक आणि उद्वेगजनक आहे. पुण्यातील सर्व सरकारी व निमसरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पहिल्यांदा पाणी मीटर बसवून किती वापर होते हे समोर आले पाहिजे. तसेच महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोसायट्यांमध्ये अग्रक्रमाने पाणी मीटर बसवण्याचे ही आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे, असे यांनी वेलणकर सांगितले. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले,‘‘पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सोसायट्यांमध्ये मीटर बसवले आहे. आयुक्त व इतर शासकीय निवासस्थानी मीटर टप्प्याटप्प्याने बसविले जाणार आहेत.