संगीत विद्यालयातील साहित्याची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

एरंडवणे - प्रभात रस्त्यावरील पुणे महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या संत तुकाराम महाराज कलाप्रबोधिनी संगीत विद्यालयात हार्मोनिअम, तबलासारख्या वाद्यांचा तुटवडा होता. वाद्यांची नियमित डागडुजी होत नव्हती. ‘सकाळ’ने यासंबंधी बातमी प्रसिद्ध केली त्यानंतर महापालिकेने त्याची दखल घेऊन वाद्यांची दुरुस्ती केली.

या शाळेत बहुतांश विद्यार्थी झोपडपट्टीतून येतात. महापालिकेच्या २३ शाळांमधून १९० मुले येथे शिकतात. त्यामध्ये गायन, हार्मोनिअम आणि तबला असे तीन विभाग आहेत. विद्यालयात एकूण २० तबले आणि वीस हार्मोनिअम होते. त्यापैकी फक्त १० तबले आणि दोन हार्मोनिअमचा वापर होत होता. उर्वरित साहित्यांची दुरवस्था झाली होती. याबाबत संगीत शिक्षिका अर्चना इरपतगिरे म्हणाल्या, वाद्यांची दुरुस्ती झाल्याने विनाअडचण विद्यार्थ्यांना शिकवता येत आहे. महापालिकेकडून आम्हाला तातडीची मदत मिळाली. असाच पाठिंबा ‘सकाळ’कडून आम्हाला कायम मिळत राहावा. संगीत विद्यालयातील वाद्यांची दुरुस्ती करण्यास आम्हाला थोडा विलंब झाला. अशी विद्यालये सुरू राहणे गरजेचे आहे. आम्ही वेळच्या वेळी साहित्याची देखभाल करू असे शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी सांगितले.

Web Title: Instrument Repairing in Music School Sakal Impact