भोसरी आगारात बसगाड्यांसाठी अपुरी जागा

सदगुरुनगर, भोसरी - पीएमपीच्या आगाराची जागा बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कमी पडत आहे.
सदगुरुनगर, भोसरी - पीएमपीच्या आगाराची जागा बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कमी पडत आहे.

शहरातील सार्वजनिक दळणवळणाच्या प्रमुख साधनांपैकी एक म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) बससेवेकडे पाहिले जाते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या ग्रामीण भागांतही पीएमपी सेवा पुरविते. प्रवाशांना दर्जेदार सेवा देता यावी, या मुख्य हेतूने पीएमटी आणि पीसीएमटी बससेवांचे २००७ मध्ये विलीनीकरण करण्यात आले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढूनही कित्येक दशकांपासून सदगुरुनगर-भोसरी, नेहरूनगर-पिंपरी आणि निगडी हेच बस आगार कार्यरत आहेत. या आगारांच्या मूलभूत समस्या आणि गरजांवर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या भोसरी-सदगुरुनगर आगाराला सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नादुरुस्त बसगाड्यांची देखभाल-दुरुस्ती करणे अवघड झाले आहे. या डेपोत सीएनजी भरण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पिंपरी आगाराकडे सुमारे ५१ गाड्यांना सीएनजी भरण्यासाठी पाठवावे लागते. तसेच या वाहनांचे तांत्रिक बिघाड शोधण्यासाठी आवश्‍यक संगणकीकृत निदान यंत्रणेचीही गरजही आहे.

पीएमपीचे सदगुरुनगर आगार सुमारे दोन एकर जागेवर आहे. तेथून रोज राजगुरुनगर-चाकणसहित पुणे महापालिका, हडपसर, कात्रज, आळंदी, वाघोली, देहूगाव आदी एकूण १७ मार्गांवर बस धावतात. त्यात पीएमपीच्या डिझेलवरील २० व ५१ सीएनजी अशा ७१ व ६० सीएनजी बस भाडेतत्त्वावरील आहेत. दर महिन्याला ब्रेकडाऊन वाहने सुमारे २२ आहेत. आगारामधून पूर्वीपासून डिझेलवरील बस सोडल्या जात असल्याने तेथे डिझेल पंपाची व्यवस्था आहे. मात्र, सध्या त्यांचे प्रमाण कमी झाले असून सीएनजीवरील वाहने ताफ्यात आली आहेत. मात्र, आगारात सीएनजी भरण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे या वाहनांना पिंपरी आगारात पाठवावे लागते. या वाहनांतील तांत्रिक बिघाडाचे निदान करण्यासाठी पीएमपीच्या ठेकेदाराकडे संगणकीकृत यंत्रणा आहे. त्याच्याकडे अनेक आगारांची जबाबदारी असल्याने कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागते. संगणकीकृत यंत्रणा आगाराला उपलब्ध झाल्यास बस वेळेत दुरुस्त होऊन मार्गस्थ होती.

आगाराची जागा अपुरी असल्याने केवळ ५१ ते ५५ वाहने पार्क करता येतात. त्यामुळे ती मार्गस्थ झाल्यावर कर्मचाऱ्यांना दुरुस्तीचे काम करावे लागते. पूर्वी ताफ्यामध्ये ९ मीटर लांबीची वाहने वापरात होती. त्यांची जागा आता १२ मीटरपर्यंतच्या वाहनांनी घेतली आहे; परंतु आगारातील सर्व्हिस रॅम्प (पीट) पूर्वीच्याच लांबी-रुंदीचा आहे. त्यामुळे, त्याचे नूतनीकरण करणे आणि नवीन रॅम्प करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com