विम्याची रक्कमच ‘असुरक्षित’

Old-People
Old-People

पिंपरी - ‘मी विमा कंपनीतून बोलतोय. तुमच्या विम्याची मुदत संपली आहे. मुदत वाढवून घ्या. परतावा चांगला मिळतोय. मुदत संपली असली तरी, मी तुमचे पैसे दुपटीने परत मिळवून देतो. त्यासाठी तुम्हाला फक्त टॅक्‍स भरावा लागेल...’ असे सांगून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जात आहे. आयुष्यात ज्या वेळी विम्याची खऱ्या अर्थाने गरज भासते, नेमकी त्याच वेळी विम्याची सर्व रक्कम हातातून निसटलेली असते. 

सध्या अशा ज्येष्ठांच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. सुरक्षित व सुखी भवितव्यासाठी आयुष्यभर जमविलेली ही पुंजी अशाप्रकारे लुबाडली जात आहे. अर्थात, हा सायबर गुन्हेगारीचाच प्रकार आहे. परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठांना कॉल व मेसेजच्या माध्यमातून लुटण्याचे गेल्या वर्षभरात पाच गुन्ह्यांतून तब्बल १५ लाखांची फसवणूक झाली आहे. 

नेमके होते काय? 
सायबर गुन्हेगार बॅंका व पतसंस्थांच्या माध्यमातून विम्याची माहिती ‘हॅक’ करतात. विम्याची मुदत संपलेली असूनही, दुपटीने पैसे मिळवून देण्याच्या प्रलोभनाला ज्येष्ठ पटकन बळी पडतात. किंबहुना, कोणतीही खात्री न करताना दूरध्वनी करणाऱ्याला ते बॅंकेचा खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक व ओटीपी देतात. खाते क्रमांक घेतल्यानंतर अनामत रक्कम स्वरूपात ज्येष्ठांना टॅक्‍सची रक्कमही जमा करण्यास सांगितले जाते. पैसे जमा झाल्यानंतर दूरध्वनी करणाऱ्याचा नंबर अचानक बंद होतो. त्यानंतर ज्येष्ठांना आपली फसवणूक झाल्याचा उलगडा होतो. संबंधित ज्येष्ठ पोलिस स्टेशनकडे धाव घेतात. परंतु, वेळ निघून गेलेली असते. नव्हे, तर आयुष्यभराची जमापुंजी हातून पूर्णपणे निसटलेली असते. मग, त्यातून येते निराशा आणि तणाव. 

घडलेल्या घटना...
विम्याचे पैसे काढून देतो तसेच वेगळ्या पॉलिसीही काढून देतो, असे सांगून बारा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच दिघीत घडली. तर, तळेगावातही एक लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. वास्तविक अशा प्रलोभनांपासून ज्येष्ठांनी दूर राहिले पाहिजे. वाकड, चिंचवड स्टेशन, तळेगाव एमआयडीसी, दिघी, देहूरोड या भागात 
विम्यासंदर्भातील फसवणुकीच्या पाच घटना घडल्या आहेत. आरोपी महाराष्ट्राबाहेरील असल्याने लवकर हाती लागत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com