मेट्रो मार्गावर इंटिग्रेटेड तिकिटिंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे - हैदराबादच्या धर्तीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो मार्गावर ‘इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टीम’ राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. त्यामुळे एकाच तिकिटावर प्रवाशांना मेट्रो, कॅब आणि पीएमपी बसमधूनही प्रवास करता येणार आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. २३ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल. या मार्गावर तेवीस ठिकाणी मेट्रो स्टेशन असतील. त्यामुळे स्टेशनवर उतरल्यानंतर प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. त्यादृष्टीने हे नियोजन केले आहे.

सिंगापूर, हैदराबाद येथे अशा प्रकारे ‘इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टीम’ राबविली आहे. मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशाला कॅबची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तर काही ठिकाणी पीएमपीएमएलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी शुल्क आकारून आठ दिवसांपासून ते एक वर्षांपर्यंतचे मेट्रो कार्ड प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तुम्ही जेवढा प्रवास कराल, तेवढे पैसे या कार्डमधून कमी होणार आहेत. तसेच त्यामध्ये पैसे भरण्याची सुविधाही असेल. जेणेकरून प्रवाशांना सहज प्रवास करणे आणि इच्छितस्थळी पोचणे शक्‍य होणार आहे.

हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो मार्गावर हैदराबादच्या धर्तीवर ‘इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टीम’ राबविण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना एकाच तिकिटावर मेट्रोसह कॅब आणि पीएमपीएमएलचा प्रवास करणे शक्‍य होणार आहे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: Integrated Ticketing on Metro Road