रखडलेल्या रोडच्या निषेधार्थ सोसायटी धारकांचे तीव्र आंदोलन | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोली : निओ सिटी ते बकोरी पर्यंत रखडलेल्या रोडच्या निषेधार्थ सोसायटी धारकांनी तीव्र आंदोलन केले.

वाघोली : रखडलेल्या रोडच्या निषेधार्थ सोसायटी धारकांचे तीव्र आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाघोली : वाघोलीतील निओ सिटी ते बकोरी पर्यंत रखडलेल्या रोडच्या निषेधार्थ सोसायटी धारकांनी तीव्र आंदोलन केले. रस्ता नाही तर मतदान नाहीच्या घोषणाही त्यांनी दिल्या.

बांधकाम व्यावसायीक व मूळ जागा मालक यांच्यातील वादामुळे हा रस्ता रखडला आहे. 10 फूट रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले आहे. या रस्त्यावरून एका वेळी दोन वाहने जात नाही. काँक्रीटीकरण रस्ता व बाजूचा रस्ता यामध्ये बरेच अंतर असल्याने वाहने आदळून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे या भागातील सोसायटी धारक खूपच त्रस्त झाले आहे. सध्या या रस्त्याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरनाचे काम हाती घेण्यात आले होते.

हेही वाचा: द्राक्षबागांवर डाऊनी मिलेड्युचा प्रादुर्भाव

एका दिवसात 10 फुटी रस्ता करून बाजूचा रस्ता त्या समांतर भरण्याचे नियोजन होते. मात्र मूळ जागा मालकांनी त्याच दिवशी स्टे ऑर्डर मिळविल्याने काम अर्धवटच राहिले. या अर्धवट रस्त्यामुळे नागरिक खूपच हैराण झाले आहे. त्याच्या निषेधार्थ सुमारे 150 ते 200 सोसाटीधारकांनी तीव्र आंदोलन करीत प्रशासन व बांधकाम व्यावसायीकांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. जर रस्ताच नव्हता तर पी एम आर डी ए ने बांधकामांना परवानगी दिलीच कशी असा प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

बकोरी रोड वरील राधेश्वरी ते बी जे एस कमान चौकापर्यंत त्यांनी निषेध मोर्चा काढला. बकोरी रस्त्यावर मानवी साखळी करून निषेध घोषणा दिल्या. बी जे एस चौकात हे आंदोलन आल्यानंतर काहीशी वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. यामुळे पोलीसांचीही धावपळ झाली. अखेर लोणीकंद पोलीसानी वाहतुक कोंडीच्या दृष्टीने विनंती करून आंदोलन उरकते घेण्यास सांगितले. यानंतर सोसायटी धारक परतले.

"या प्रश्नी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेणार आहे. त्यांच्याकडे रस्ता करण्याची मागणी करणार आहे. तो लवकर झाला नाही तर पुणे नगर महामार्ग चक्का जाम आंदोलन करणार." - संजीवकुमार पाटील, वाघोली सोसायटी हौसिंग असोसिएशन.

"लोकप्रतिनिधी केवळ मतदानापुरते येतात. बांधकाम व्यावसायीक त्यांचे प्रकल्प विकून निघून जातात. यामुळे सोसायटी धारकांचे असे प्रश्न सुटत नाही. प्रशासनही ढिम्म आहे. रस्ता झाला नाही तर तीव्र आंदोलन होईल" - प्रकाश जमदाडे, रहिवाशी.

loading image
go to top