पुणे : आठ दिवसांत अतिदक्षता विभाग

शिवाजीनगर - दळवी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करताना शेखर गायकवाड, तेजराज पाटील, आय. पी. इनामदार आदी.
शिवाजीनगर - दळवी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करताना शेखर गायकवाड, तेजराज पाटील, आय. पी. इनामदार आदी.

पुणे - महापालिका आणि क्रेडाई पुणे मेट्रो या बांधकाम व्यावसायिक संघटनेने अवघ्या आठ दिवसात एक कोटी रूपये खर्च करून शिवाजीनगर येथील महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला. यासाठी सर्व खर्च ‘क्रेडाई’तर्फे करण्यात आला. 

पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या उपस्थितीत या अतिदक्षता विभागाचे हस्तांतरण करण्यात आले. पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे, क्रेडाई पुणे मेट्रोचे पदाधिकारी तेजराज पाटील व आय. पी. इनामदार आदी यावेळी उपस्थित होते. 

या अतिदक्षता विभागात खाटा, व्हेंटिलेटर, डिफिलेटर, सक्‍शन मशीन, इसीजी मशीन इत्यादी अद्ययावत उपकरणांचा समावेश असून सध्याच्या काळात कोविड -१९शी लढणाऱ्या रुग्णांना यामुळे चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. या वेळी मोहोळ आणि मर्चंट यांचे भाषण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com