उद्योजकतेचा ग्रामीण विद्यार्थ्यांनाही ध्यास

Savitribai-Phule-University
Savitribai-Phule-University

पुणे - विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे गुण यावेत, त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात साकारता यावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन ‘स्टार्टअप’ स्पर्धेत सहभागी १०० महाविद्यालयांपैकी ४३ ही ग्रामीण भागातील आहेत. विशेष म्हणजे, कला शाखेच्याही अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रस्ताव सादर केले आहेत.

विजेत्यांना एक लाखाचे बक्षीस
आयटूई स्पर्धेत दोन विजेते निवडले जाणार आहेत. पहिल्या क्रमांकास १ लाखाचे बक्षीस; तर द्वितीय क्रमांकासाठी ५० हजार रुपयांचे बक्षीस असेल. तसेच या टीममधील विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या इन्क्‍युबेशन सेंटरमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे, असे पालकर यांनी सांगितले.

स्पर्धकांना प्रशिक्षण देणार
या स्पर्धेत १०० महाविद्यालयांच्या २०० टीम सहभागी. प्रत्येकी दोन ‘स्टार्टअप’ प्रस्ताव
उद्योजक का व्हावे? स्पर्धेत टिकण्यासाठी काय करावे? मार्केटिंग, कायदेशीर सल्ला याबाबत ऑनलाइन प्रशिक्षण
क्‍लस्टर राउंडमध्ये १५ टीम निवडणार 
या १५ टीममध्ये जानेवारीत अंतिम स्पर्धा

केवळ शहरी भागातील नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचा ध्यास असल्याचे दिसून येते. शिवाय, या स्पर्धेत कला शाखेसह फार्मसी, आर्किटेक्‍चर शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने ‘स्टार्टअप’साठी नवीन संकल्पना समोर येणार आहेत.  
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालक, इन्क्‍युबेशन सेंटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com