विज्ञानदिनी साधता येणार शास्त्रज्ञांशी संवाद

विज्ञानदिनी साधता येणार शास्त्रज्ञांशी संवाद

पुणे - रोजच्या वापरातील वस्तू, औषधे, तंत्रज्ञान यांच्यामागील विज्ञान समजून घ्यायचे असेल आणि शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधायचा असेल, तर राष्ट्रीय विज्ञान दिनापेक्षा उत्तम संधी नाही! वर्षभर सामान्यांसाठी बंद असलेले वैज्ञानिक संस्थांचे दरवाजे विज्ञानदिनी नागरिकांसाठी खुले होतात. विज्ञानदिनी शुक्रवारी (ता. २८) विविध संस्थांनी प्रयोगांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत  ही प्रदर्शने खुली असणार आहेत. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील संस्था
आयुका :   तारीख-वेळ - २८ आणि २९ (सकाळी १० ते संध्या. ५)
  काय पहाल? - विविध प्रदर्शने, फोकाल्ड दोलक, डॉ. जयंत नारळीकरांसह विविध वैज्ञानिकांशी चर्चा (वेळ दुपारी २ वा.), दुपारी ३-१५ आणि संध्याकाळी ६-०० वाजता विशेष व्याख्यान.
सी-डॅक 
काय पहाल? - परम महासंगणक, सॉफ्टवेअर निगडित विविध प्रदर्शने.
सायन्स पार्क
काय पहाल? - प्रदर्शनांसह विज्ञानाची गंमत सांगणारे प्रयोग.
विद्यापीठातील विविध विभाग
काय पहाल? - प्रत्येक विभागातील प्रयोगशाळा पाहण्याची संधी, प्रदर्शने आणि प्रयोगांचे प्रदर्शन. तसेच, तेथील शास्त्रज्ञांशीसुद्धा संवाद साधता येणार
राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस)
काय पहाल? - प्राणी, जीवाणू, विषाणू आदींच्या पेशींसंबंधीची प्रदर्शने, जाणून घ्या पेशीविश्‍वाचे अंतरंग

आघारकर संशोधन संस्था
 ठिकाण - गोपाळ गणेश आगरकर रस्ता, डेक्कन परिसर
 काय पहाल? - जीवाश्‍म, औषधी झाडे, ड्रोसोफिलासह विविध प्रदर्शने
भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संशोधन संस्था (आयआयटीएम)
 ठिकाण - पाषाण रस्ता 
 काय पहाल? - हवामानशास्त्राशी निगडित विविध प्रदर्शने, प्रयोगशाळा

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र 
 तारीख व वेळ - ता. २८ आणि २९ (सकाळी ९ ते संध्या. ५)
 ठिकाण - जीएमआरटी, खोडद, नारायणगाव
 काय पहाल? - जगातली सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण, इस्रो, नारी, टीआयएफआर यांसह २० संस्थांची प्रदर्शने. तसेच, जिल्ह्यातील शाळा आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे २०० प्रकल्प.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com