‘डिजिटल थिंकिंग’वर आज तरुणांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

‘डिजिटल थिंकिंग’विषयी तरुणांशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाचे ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आकुर्डी येथे गुरुवारी (ता. २९) आयोजन केले आहे. 

पुणे -  ‘डिजिटल थिंकिंग’विषयी तरुणांशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाचे ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आकुर्डी येथे गुरुवारी (ता. २९) आयोजन केले आहे. 

त्यात अभिनेते-लेखक आणि दिग्दर्शक ध्रुव सहगल, डिजिटल तज्ज्ञ व वक्ते अमित जाधव, शॉप्टिमाइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश पंडितराव, किलोबीटर्सच्या सहसंस्थापक श्‍यामा मेनन हे तरुणांशी संवाद साधतील. ‘डिजिटल थिंकिंग’ विषयावर ‘यिन टॉक-शो’मध्ये गप्पा रंगणार आहेत. राज्यभरात होणाऱ्या गप्पांमध्ये डिजिटल क्षेत्रातील विविध पैलू उलगडले जाणार आहेत. डिजिटल क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती संवाद साधतील. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक विवेक बिडगर असोसिएट्‌स व उत्सव होम्स हे असून स्थळ प्रायोजक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट हे आहेत.

  स्थळ : एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर अँड डिझाईन, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, निगडी- प्राधिकरण 
  वेळ : सकाळी ११ वाजता (प्रवेश मोफत)
  नोंदणीसाठी संपर्क: ९६०४४१७५७५, ९०७५००७९५८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interaction with youth today on Digital Thinking