इंटरसिटी एक्‍स्प्रेस नव्या रूपात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पुणे - नव्या १६ ‘एलएचबी’ डब्यांची पुणे-मुंबई इंटरसिटी एक्‍स्प्रेस नुकतीच मुंबईकडे रवाना झाली. पुणे रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. 

पुणे - नव्या १६ ‘एलएचबी’ डब्यांची पुणे-मुंबई इंटरसिटी एक्‍स्प्रेस नुकतीच मुंबईकडे रवाना झाली. पुणे रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. 

या वेळी पुणे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, विभागीय कार्यकारी अधिकारी गौरव झा, स्थानक संचालक ए. के. पाठक, स्थानक उपव्यवस्थापक के. के. तिवारी, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, पॉइंटमन दत्तू नारायण खैरे, सुरेश पाखरे आदी उपस्थित होते. गाडीतून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान, शहा यांनी इंटरसिटी एक्‍स्प्रेसप्रमाणे सुपरफास्ट एक्‍स्प्रेस, मेल, दुरांतोच्या बोगी बदलाव्यात, तसेच डेक्कन क्वीनला दोन कोच व दोन डायनिंग कार असाव्यात अशी मागणी केली. 

Web Title: Intercity Express new look