पुणे कॉंग्रेसमध्ये उफाळला अंतर्गत वाद 

पुणे कॉंग्रेसमध्ये उफाळला अंतर्गत वाद 

शहर कॉंग्रेसला 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर घरघर लागली. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला शहरात एकाही जागेवर विजय मिळाला नाही. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावे लागले. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन जागा मिळाल्या. याउलट शहर कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीत शहर व राज्य पातळीवर नेत्यांची मदत झालेली नसतानाही कार्यकर्त्यांच्या बळावर कॉंग्रेसच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली; परंतु त्यांना अपयश आले. त्यामुळे शहर पातळीवरील नेत्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर अनेक पक्षांनी यश-अपयशाचे चिंतन केले. मात्र, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना होत आला, तरीही शहर कॉंग्रेसमधील नेत्यांना पराभवामागचे कारणे शोधण्यात रस नसल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांनी अनेकदा मागणी करूनही शहर पातळीवर एकाही नेत्याने बैठक घेण्याबाबत पुढाकार घेतला नाही. त्यांचे पडसाद आता उमटू लागले आहेत. 

विधान परिषदेवर शहरातील पक्षाचे दोन आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही आमदार प्रचारात सक्रिय दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता "एनएसयूआय'ने मोहीम उघडली आहे. "गेल्या तीन वर्षांत महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण काय योगदान दिले, यांचे आत्मचिंतन करावे. आपण आपल्या जबाबदारीत अपयशी ठरल्यामुळे आमदाराकीचा राजीनामा द्यावा आणि पुणे शहरातील युवा नेतृत्वाला आणि विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी द्यावी. जेणेकरून आपला पक्ष पुणे शहरात वाढू शकेल,' अशा अशयाचे फलक कॉंग्रेस भवन येथे लावले आहेत. हे फलक शहर कॉंग्रेसमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com