esakal | पुणे : कोथरूड ते आनंदनगर मेट्रोची तांत्रिक चाचणी, पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : कोथरूड ते आनंदनगर मेट्रोची तांत्रिक चाचणी, पाहा व्हिडिओ

पुणे : कोथरूड ते आनंदनगर मेट्रोची तांत्रिक चाचणी, पाहा व्हिडिओ

sakal_logo
By
समाधान काटे

कोथरूड : पुणेकरांना मेट्रोतून लवकर प्रवास करता यावा, यासाठी मेट्रो प्रशासनाकडून गतीने काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोथरूड येथील मेट्रो डेपो ते आनंद नगर अशा तीन कोचची मेट्रो रुळावरून धावली. ही मेट्रोची अंतर्गत चाचणी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही चाचणी झाल्यानंतर त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे व्हिडिओ खरंच कोथरूडमधील चाचणीचे आहेत काय? याची खात्री करण्यासाठी अनेक नागरिक एकमेकांकडे विचारणा करत होते.

हेही वाचा: ‘पीएमपीएमएल’मध्ये १४ वर्षांत तब्बल १६ अध्यक्ष !

कोथरूड डेपो ते आयडियल कॉलनी परिसरात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मेट्रोची चाचणी घेण्यात आली. अनेकांनी मेट्रो ट्रायल सुरू आहे असे व्हिडिओ व्हायरल केले परंतु ती अंतर्गत चाचणी असल्याने सुत्रांकडून सांगण्यात आले. व्हिडिओची खात्री पटल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. आता लवकरच मेट्रोतून प्रवास करायला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चाचणी यशस्वी झाल्याचे पाहून मेट्रो प्रशासनानेही समाधान व्यक्त केले. फोटोओळ

loading image