बारामती येथे यंदापासून आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

मिलिंद संगई
Monday, 25 January 2021

 यंदाच्या नोव्हेंबरपासून बारामतीत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन केले जाणार आहे.

बारामती : यंदाच्या नोव्हेंबरपासून बारामतीत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन केले जाणार आहे. बारामती स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश ननवरे यांनी दिली. कारभारी फाउंडेशनचे सचिव प्रशांत नाना सातव हेही या प्रसंगी उपस्थित होते. 

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​

जगाच्या नकाशावर बारामतीचे वेगळे स्थान आहे. बारामतीची ओळख इंटरनँशनल मॅरेथॉनच्या माध्यमातून जगापर्यंत जावी, युवकांमध्ये क्रिडा संस्कृती रुजावी या उद्देशाने ही स्पर्धा बारामतीत होणार आहे. या स्पर्धेत केनिया, इथिओपिया, युरोप सारख्या देशासह राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील खेळाडू यात सहभागी होणार आहेत.

महाविद्यालयीन युवकांसाठी दहा किमी, व्यावसायिक खेळाडूंसाठी 21 किमीची हाफ मॅरेथॉन होणार असून, स्पर्धकांसाठी 42 किमीची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. या मध्ये राष्ट्रीय खेळाडूंसाठी स्वतंत्र तर परदेशी खेळाडूंसाठी स्वतंत्र विभाग करुन त्यातून पारितोषिके दिली जाणार असल्याचे सतीश ननवरे यांनी सांगितले. या शिवाय आजपर्यंत कधीच मॅरेथॉनमध्ये सहभागी न झालेल्या नागरिकांसाठीही एक तीन किमीची फन रन होणार आहे.

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

या मॅरेथॉनच्या प्रशिक्षणासाठी अगोदर काही दिवस सरावही घेतला जाणार असून यात सहभागी व स्पर्धा पूर्ण करणा-या प्रत्येकाला पदक दिले जाईल. प्रजासत्ताकदिनी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. 

बारामतीत विनामूल्य मार्गदर्शन..
दरम्यान बारामतीत धावणे, सायकल, स्विमींग या सारख्या बाबतीत बारामती स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने विनामूल्य मार्गदर्शन क्रिडापटूंना केले जात असल्याचेही ननवर यांनी नमूद केले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: international marathon to be held in baramati