'करो योग रहो निरोग'चा संदेश देत पारवडीत योगदिन साजरा

संतोष आटोळे 
गुरुवार, 21 जून 2018

येथील विद्यालयाच्या भव्य क्रिडांगणावर झालेल्या योगदिनाच्या कार्यक्रमात 1100 विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

शिर्सुफळ - 'करो योग रहो निरोग'चा संदेश देत पारवडी (ता. बारामती) येथील कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय, इंग्लिश मेडियम स्कुल व ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थांनी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी योग कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांची रांगेची व्यवस्था आकर्षण ठरली.            

येथील विद्यालयाच्या भव्य क्रिडांगणावर झालेल्या योगदिनाच्या कार्यक्रमात 1100 विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी क्रिडा शिक्षक राजेंद्र पोमणे यांनी ओंकार, सूक्ष्म व्यायाम, कटीचक्रासन, उत्कटासन, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मकरासन आदी आसने स्वता करीत विद्यार्थांकरवी करवुन घेतली यावेळी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था आकर्षक ठरली. प्राचार्य सखाराम गावडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगा दिवस यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गावडे, सचिव संगीता गावडे, सरपंच जिजाबा गावडे, माजी पंचायत समिती सदस्य तानाजी गावडे यांनी योगदिनानिमित्त तयार केलेल्या बैठक व्यवस्थेचे कौतुक केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: International yoga day at shirsufal parvadi baramati