जुन्नर येथील जि. प. शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा          

दत्ता म्हसकर
गुरुवार, 21 जून 2018

उच्छिल ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद शाळेत आज गुरुवार ता. 21 ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

जुन्नर - उच्छिल ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद शाळेत आज गुरुवार ता. 21 ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयीचे महत्त्व विशद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. 

योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य दिन साजरा करण्यात येतो. यावेळी सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम व उत्तेजक हालचाली आणि योगासने सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केली. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद, उपशिक्षक सुभाष मोहरे, स्मिता ढोबळे, आरती मोहरे आणि लिलावती नांगरे या सर्वांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेतला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: International yoga day at uchchil junnar pune