महर्षि वाल्मिकी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन

किशोर कुदळे
गुरुवार, 21 जून 2018

वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षि वाल्मिकी विद्यालयामध्ये आज (दि. 21) जागतिक योगदिनानिमित्त महर्षि वाल्मिकी विद्यालय व येथील 'सकाळ चोपदार' फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केले होते. 

वाल्हे (ता. पुरंदर) - येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षि वाल्मिकी विद्यालयामध्ये आज जागतिक योगदिनानिमित्त आयोजित केलेल्या योगप्राणायम शिबिरामध्ये 'योगदिना'ची मानवी प्रतिकृती तयार करुन योगदिन साजरा करण्यात आला.

वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षि वाल्मिकी विद्यालयामध्ये आज (दि. 21) जागतिक योगदिनानिमित्त महर्षि वाल्मिकी विद्यालय व येथील 'सकाळ चोपदार' फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या योगप्राणायम शिबिरामध्ये 'योगदिना' ची मानवी प्रतिकृती तयार करुन विद्यालयातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या जवळपास 775 विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी एक तासभर सामुहिक योगासणे करण्यात आली.

टि. व्ही. आणि मोबाईलच्या नादात मुलांचे शरीर सुदृढतेकडे दुर्लक्ष होत आहे. शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी योगासनांची नितांत आवश्यकता आहे.
योगा करण्यामुळे मानवाचे फक्त शरीरच नाही तर मन देखील प्रसन्न ठेवण्यास मदत होऊन योगसाधना आपल्याला एक नवीन उर्जा देत असते. योगाच्या अभ्यासाने मनाची स्थिती चांगली होते. अनेक वेळेस नैराश्य, शरीरातील ताणतणावामुळे दाह वाढतो व त्यातूनच अनेक रोगांना निमंत्रण मिळते. योगातील शारीरीक व्यायामामुळे हा दाह कमी होतो शारीरीक तसेच मानसिक पातळीवरही सकारात्मक बदल दिसून येतात. 

त्याचप्रमाणे संधिवात किंवा स्नायुंचे आजारही बरे होण्यास मोलाची मदत होऊन याचा परिणाम वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील होऊ शकतो, असे मत महर्षि वाल्मिकी विद्यालयाचे प्राचार्य जी. ई. साळुंखे यांनी व्यक्त केले.

सहशिक्षक व्हि. जी. ठाकुर यांनी प्रात्यक्षिक करुन दाखविले तर विद्यालयातील पर्यवेक्षक जे. एम. दाभाडे, पी. बी. जगताप, बी. ए. कुंभार, के. बी. दरेकर, एस. एच. गंभीर, एस. एच. रासकर, एस. पी. खताळ, आर. व्हि. सोनवणे, एस. एम. भामे, बी. एल. जगताप आदिंनी संयोजन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: International Yoga Day At Valhe Purandar Pune