योगशास्त्रातील करिअर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

आज योगशास्राला आलेले महत्त्व आपण सर्वजण जाणतो. आजच्या बदललेल्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे योगशास्त्रही जीवनावश्‍यक बनले आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळेच माणूस अनेक गंभीर आजारांच्या विळख्यात अडकला आहे. योगशास्रामुळे त्यांची जीवनशैली चांगली बनू शकते.  योगाचा प्रसार वाढल्यामुळे करिअरच्या संधी वाढत आहेत. या संधींबाबत उपलब्ध अभ्यासक्रम.

आज योगशास्राला आलेले महत्त्व आपण सर्वजण जाणतो. आजच्या बदललेल्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे योगशास्त्रही जीवनावश्‍यक बनले आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळेच माणूस अनेक गंभीर आजारांच्या विळख्यात अडकला आहे. योगशास्रामुळे त्यांची जीवनशैली चांगली बनू शकते.  योगाचा प्रसार वाढल्यामुळे करिअरच्या संधी वाढत आहेत. या संधींबाबत उपलब्ध अभ्यासक्रम.

योगशिक्षक पदविका - Diploma in Yoga Education
योग थेरपिस्ट - Yoga Therapist
नॅचरोथेरपिस्ट - Naturo Therapist
बी. ए. योगशास्त्र - B.A. Yoga
एम. ए. योगशास्त्र - M.A. Yoga
योग मार्गदर्शक -  Yoga Instructor
योग शिक्षक - Yoga Teacher
योग तज्ज्ञ - Yoga Master

सर्व परीक्षा आरोग्य मंत्रालय यांच्याअंतर्गत होतात.  या सर्व अभ्यासक्रमासाठी आपल्याला योगशास्राचे ज्ञान घेण्यासाठी प्रथम ‘योगशिक्षक पदविका’ हा अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे जाता येते. फक्त योगशिक्षक पदविका केल्यानंतरही पुढील करीअरचे मार्ग मोकळे होतातच. परंतु, लगेचच स्वतःचे योगक्‍लास सुरू करता येतात. त्याचबरोबर शासनामध्ये आता योगशिक्षक नेमण्याचे नियोजन चालू आहे. 

विविध शाळा, जीम, पार्लर व थ्री स्टार हॉटेल येथे नोकरी आहे. हा अभ्यासक्रम साधारण एक वर्षाचा आहे.  

‘योगशिक्षक पदविका’ पूर्ण केल्यानंतर पुढे बी.ए., एम.ए., आणि पी.एचडी. असे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोय विद्यापीठामध्ये आहेत. अशा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खासगी, सरकारी, देशात-परदेशात संधी उपलब्ध असून, स्वतंत्र योगविषयक संस्था सुरू करता येतात. 

कौशल्य विकास योजना
या कौशल्यविकास योजनेंतर्गत अनेक कौशल्य अभ्यासक्रम तयार केले असून, यात yoga therapist आणि naturo therapi हे अभ्यासक्रम योग व आरोग्य विषयक आहेत. या अभ्यासक्रमासाठी दहावी/बारावीमध्ये किमान उत्तीर्ण चालणार असून, वय १८ ते ४५ वयाच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. 

quality council of india
भारतातील महत्त्वाच्या योगतज्ज्ञांनी आरोग्य मंत्रालयाच्या (ayush) सहयोगाने हे कौन्सिल तयार केलेले आहे. डॉ. नागेंद्र, श्री.श्री. रविशंकर, स्वामी रामदेव, कै. अय्यंगार गुरुजी, ओ. पी. तिवारी (कैवल्यधाम), डॉ. ईश्‍वर बसवरेड्डी अशा योगगुरुच्या मार्गदर्शनाप्रमाणे कौन्सिल कार्य करते.

विविध पद्धतीने योग कार्यामध्ये असलेल्या व्यक्तींना योगाच्या परीक्षा घेऊन केंद्र शासनाचे माध्यमातून प्रमाणित करणे हा या कौशल्याचा मुख्य उद्देश आहे. यासाठी खालील चार परीक्षा तयार केलेल्या आहेत. 
१. yoga instroctor (level I)
२. yoga teacher (level II )
३. yoga master ४)
४. yoga guru

अशा परीक्षा देण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रतेची अट नसून, स्वतःचे किंवा कोणत्याही योगशिक्षण संस्थेतून अभ्यास करून या परीक्षेत बसता येते.

indian yoga association ः-
ही असोसिएशनही वरीलप्रमाणेच qci चे अंतिम काम करते. वरील सर्व परीक्षा घेण्याची मान्यता या असोसिएशनकडे आहे. या पद्धतीने योग अभ्यासक्रम पूर्ण केल्यासही उत्तम करिअर आहे. यासाठी प्रथम योगशिक्षक होऊन पुढचे शिक्षण घेता येते. देशात परदेशामध्येही उत्तम उत्पन्नाचे स्रोत आहेत. यासाठी अनेक मान्यताप्राप्त संस्था कार्यरत आहेत. 

Web Title: International Yoga Day Yoga career