आंतरराष्ट्रीय किर्तीचे पखवाज वादक गोविंद भिलारे यांचे निधन

ni.jpg
ni.jpg

नसरापूर : आंतरराष्ट्रीय किर्तीचे पखवाज वादक पंडित गोविंद पर्वती भिलारे (वय 44) यांचे पुण्यात निधन झाले. मुळचे किकवी ता. भोर येथील सामान्य शेतकरी कुटंबात जन्मलेले गोविंद भिलारे यांनी पखवाज वादन कलेसाठी स्वतःला झोकून दिले होते. नानासाहेब पानसे घराण्याचे प्रसिद्ध पखवाज वादक शंकरराव घोरपडकर, तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे ते पट्टशिष्य होते.

सिध्दहस्त कलाकार घराणेदार पखवाज वादक व प्रथितयश शिष्य घडवणारे गुरु म्हणून त्यांचे ओळख होती शास्त्रीय संगीता बरोबरच वारकरी संप्रदायाचा पखवाज जगभर पोहचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

आवर्तन गुरुकुल, पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ येथे पखवाज विषयाचे ते मानद गुरु, तसेच पुणे महानरपालिकेच्या विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सवाई गंधर्व महोत्सव, बदामी फेस्टिवल, ताज फेस्टिवल, हर वल्लभ संगीत सभा, तानसेन महोत्सव यांसारख्या संगीत महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली होती. 

सोलो पखवाज वादना बरोबरच पं.भीमसेन जोशी,पं जसराज, उस्ताद झाकीर हुसेन, पं.उल्हास कशाळकर, पं.विकास कशाळकर, पं.अरविंद कुमार आझाद, पं.विश्र्वमोहन भट सारख्या दिग्गजां बरोबर त्यांनी साथसंगत केली आहे, गुरू पं.शंकरराव घोरपडकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी सुरू केलेला शंकर-वसंत हा पखवाज महोत्सव संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. तसेच "शिवोहम" ही त्यांची पखवाज, गायन व नृत्य यांची विशेष प्रस्तुती देखिल प्रसिध्द आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तीन दिवसांपूर्वी त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (ता. 2 आॅगस्ट रोजी) त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील,  पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com