रोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणारः किरण घोंगडे

युनूस तांबोळी
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा रोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणार असल्याचे प्रतिपादन शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी केले.

चांडोह (ता. शिरूर) येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष संपत वळसे, पोलिस पाटील सुदर्शन भाकरे, उद्योजक भाऊसाहेब पानमंद, खरेदी विक्री संघाचे संचालक संपत पानमंद, मुख्याध्यापक विलास घोडे, उपसरपंच कचर पानमंद, तुकाराम भुजबळ, केशव कोंडे, म्हतारबा शेलार, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थीत होते.

घोंगडे म्हणाले की, मोबाईलचे अनेक फायदे असले तरी देखील विद्यार्थी त्यांचा गैरवापर अधिक करत आहेत. स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी मोबाईल सारख्या व्यसनावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. कमी वयात मुले या व्यसनाच्या आहारी जाऊन करीयर चे नुकसान करून घेऊ लागले आहेत.

चांडोह (ता. शिरूर) गावात यावेळी पाचशे झाडे लावण्याचा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पांडूरंग सालकर यांनी केले. बाबाजी वडने यांनी आभार मानले.

Web Title: internet social media and youth shirur pis kiran ghongde