पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस इच्छुकांच्या आज मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या (मंगळवारी) काँग्रेस भवनमध्ये होणार आहेत.

पुणे -  पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या (मंगळवारी) काँग्रेस भवनमध्ये होणार आहेत. शहरातील विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे आणि राजेश शर्मा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

सकाळी अकरा ते बारा या वेळेत पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांतील मुलाखती होणार आहेत. त्यानंतर पुणे कॅंटोन्मेंट, शिवाजीनगर, पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड, हडपसर आणि कसबा विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती होतील, अशी माहिती पुणे शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अजित दरेकर यांनी दिली. पुण्यातील आठ मतदारसंघांत ५३ इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. त्यात कसबा आणि शिवाजीनगर मतदारसंघांत इच्छुकांची संख्या सर्वाधिक  आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interviews of Congress aspirants today