महिला सबलीकरणाचे इनरव्हील क्‍लबचे ध्येय: रेनुजी गुप्ता

एकलहरे (ता. आंबेगाव) : इनरव्हील क्‍लब ऑफ मंचरच्या पदग्रहण समारंभावेळी उपस्थित अध्यक्ष डॉ. मधुरा हर्षद शेटे (डावीकडून पाचव्या), इनरव्हील क्‍लबच्या जिल्हा अध्यक्षा रेनुजी गुप्ता (डावीकडून चौथ्या).
एकलहरे (ता. आंबेगाव) : इनरव्हील क्‍लब ऑफ मंचरच्या पदग्रहण समारंभावेळी उपस्थित अध्यक्ष डॉ. मधुरा हर्षद शेटे (डावीकडून पाचव्या), इनरव्हील क्‍लबच्या जिल्हा अध्यक्षा रेनुजी गुप्ता (डावीकडून चौथ्या).

मंचर (पुणे) : "जागतिक महिला सबलीकरण हे जागतिक इनरव्हील क्‍लबचे ध्येय आहे. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळून देण्यासाठी त्यांना गरजेनुसार प्रशिक्षण द्यावे. तसेच, पर्यावरण संरक्षणासाठी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर वाढविण्यासाठी इनरव्हील क्‍लबने पुढाकार घ्यावा,'' असे आवाहन इनरव्हील क्‍लबच्या जिल्हाध्यक्षा रेनुजी गुप्ता यांनी केले.

एकलहरे (ता. आंबेगाव) येथे इनरव्हील क्‍लब ऑफ मंचर यांचा 14 वा पदग्रहण समारंभ गुप्ता यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी अध्यक्ष डॉ. मधुरा हर्षद शेटे, उपाध्यक्ष डॉ. स्नेहल गुजराथी, सचिव डॉ. सुचेता शेटे, खजिनदार रश्‍मी भंडारी आणि आयएसओ दीपा पाटील यांनी पदाचा स्वीकार केला. या वेळी नेत्रा शहा, डॉ. दीपाली मांढरे, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष सचिन चिखले, डॉ. मोहन साळी, आशिष पुंगलिया, आंबेगाव तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव सुपेकर आदी उपस्थित होते.

या वेळी मधुरा शेट्टे म्हणाल्या, "स्त्रियांचे मानसिक व वैचारिक सबलीकरण होणे गरजेचे आहे. मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्याबाबत प्रयत्न केले जातील.'' सरपंच दत्ता गांजळे, डॉ. प्रवीण कडधेकर, डॉ. हेमंत चिखले, डॉ. सौरभ गुजराथी, डॉ. माणिक बांगर व डॉ. जयंत शेटे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. मनीषा वळसे पाटील व डॉ. लीना गुजराथी यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com