‘कोरेगाव भीमा’चा तपास सीबीआयकडे द्या

जिल्हाधिकारी कार्यालय - भीमा कोरेगाव येथील घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या मागणीसाठी निदर्शने करताना कार्यकर्ते.
जिल्हाधिकारी कार्यालय - भीमा कोरेगाव येथील घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या मागणीसाठी निदर्शने करताना कार्यकर्ते.

पुणे - कोरेगाव भीमाप्रकरणी एक जानेवारीला शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा. तसेच, संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

घटनेच्या दोन वर्षांनंतरही केवळ काही आरोपींनाच अटक करण्यात आली आहे. तपास थांबविण्यात येऊन अद्याप कोणत्याही गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे गुन्ह्याचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशी मागणी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे आणि रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केली आहे. या आंदोलनात मूलनिवासी मुस्लिम मंचचे अंजुम इनामदार, इंडियन मुस्लिम फ्रंटचे मुनवर कुरेशी, बहुजन संघर्ष सेनेचे कृष्णा आदमाने यांच्यासह राहुल तायडे, स्नेहल कांबळे, अजय लोंढे, गौरव जाधव, विठ्ठल गायकवाड, राजू शिरसाट, फकीर इनामदार, रूपाली काळभोर, संतोष डंबाळे, शालन कांबळे, धम्मानंद क्षीरसागर, नागेश मिसाळ आदी सहभागी झाले होते.

अधिवेशनात बैठक - राऊत
कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विशेष बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन मंत्री नितीन राऊत यांनी दिले. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विकास विभागाचे शहराध्यक्ष सुजित यादव, विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राऊत यांची भेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com