वाघोलीतील अवैध धंद्यावर धाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

वाघोली (पुणे) : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने वाघोलीतील बाजारतळ मैदानाजवळील मटका, जुगार, लॉटरी चालणाऱ्या अवैध धंद्यावर आज दुपारी धाड टाकली. या वेळी 20 ते 25 जण तेथे जुगार खेळताना आढळून आले. तसेच रोकड ही आढळून आल्याने समजते. रस्त्यालगत पत्र्याच्या शेड मध्ये हे अवैध धंदे सुरू होते.

पोलिसांनी मुद्दे माल जप्त करून जुगार खेळणाऱ्यांना लोणी कंद पोलीस ठाण्यात कारवाईसाठी टेम्पो व जीप मधून नेले. तेथील मुद्दे मालही जप्त करण्यात आला. धाड टाकल्याचे कळताच बघ्यांची तेथे गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केल्याचे समजते.  लोणीकंद पोलीस ठाणे अंतर्गत आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे. चार दिवसांपूर्वी खादंवेनगर येथील जुगार अड्ड्यावर आय जी विशेष पथकाने कारवाई केली होती. त्यावेळीही काही रोकड सापडली होती.

Web Title: Investigation Department's raid on illegal business